Calcium Rich Foods | कॅल्शियमने समृद्ध असलेले ८ पदार्थ खा, हाडांना मजबूत बनवा!

पुढारी वृत्तसेवा

कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करणे हे हाडांची मजबूतीसाठी खूप गरजेचे असते. कारण हाडे मजबूत तर सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी याचा त्रास होत नाही

चीज कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे, जो मजबूत हाडे आणि दात बळकट करण्यास व शरिरात कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत करतो

कॅल्शियमच्या बाबतीत दूध हे परिपूर्ण असते व याची उपलब्धता सर्वाधिक असते. दूधातील कॅल्शियम मानवी शरीर सहजपणे शोषून घेते

बदाम हे सुपरफूड असते यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि फायबर याने हे परिपूर्ण असलेले

साधे किंवा कमी फॅट असलेले दही, यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. जे हाडांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

टोफू हा सोयाबिनपासून तयार केलेल पनीरसारखा पदार्थ, टोफूमधून शरीरात शोषले जाणारे कॅल्शियमचे प्रमाण गाईच्या दुधाच्या शोषण दरासारखेच असते

नाचणी हे तृणधान्य कॅल्शियमचा सर्वात समृद्ध वनस्पतीजन्य स्रोत आहे, याची भाकरी आहारात समाविष्ट करणे हे खूप गरजेचे आहे.

पांढरे तिळ हे छोटेसे बी कॅल्शियमने समृद्ध असते. तिळ जेवणात, सॅलडमध्ये किंवा नाश्त्यामध्ये घालता येतात. याच्या तेलाने मालिशही करता येतात

सर्वात सोपा व सहज मिळणारा पदार्थ म्हणजे चणे, हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असतो . याचा समावेश सॅलड, आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो.