Monsoon Travel Maharashtra : लाल परीने अनुभवावे असे ७ सुंदर घाट

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात महाराष्ट्रातील घाटरस्त्यांचे सौंदर्य काही वेगळाच आनंद देते. चला पाहूया ७ अप्रतिम घाट!

ताम्हिणी घाट

पुणे आणि कोकणाला जोडणारा ताम्हिणी घाट पावसाळ्यात हिरवागार होतो. लाल परीच्या खिडकीतून दिसणारे धबधबे मन मोहून टाकतात.

आंबा घाट

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात पावसाळ्यात प्रचंड धुके असते. या धुक्यातून लाल परीने प्रवास करणे म्हणजे स्वर्गीय अनुभव..

आंबोली घाट

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण! येथील अथांग दऱ्या आणि कोसळणारे मुख्य धबधबे एसटीच्या प्रवासातून खूपच विहंगम दिसतात.

माळशेज घाट

ठाणे-अहमदनगर सीमेवरील माळशेज घाटात थेट रस्त्यावर ढग उतरतात. कड्यावरून कोसळणारे पाणी लाल परीला स्पर्श करून जाते.

वरंधा घाट

भोर आणि महाड दरम्यानचा हा घाट प्रचंड निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. वळणावळणाच्या रस्त्यावरून लाल परीचा प्रवास थरारक वाटतो.

कशेडी घाट

मुंबई-गोवा हायवेवरील कशेडी घाट पावसाळ्यात अत्यंत देखणा दिसतो. उंचावरून दिसणारी कोकणची सुंदर खेडी डोळ्यांचे पारणे फेडतात.

भोर घाट / खंडाळा घाट

मुंबई-पुणे मार्गावरील हा घाट पावसाळ्यात जिवंत होतो. रेल्वेचे पूल, बोगदे आणि हिरवे डोंगर लाल परीतून पाहणे हा एक सुखद अनुभव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.