Hair Growth: केस गळती थांबेल अन् दाट होतील; रोज खा 'या' ७ चमत्कारिक बिया

पुढारी वृत्तसेवा

महागड्या हेअर ट्रिटमेंटपेक्षा रोजच्या आहारात 'या' ७ बियांचा समावेश करा आणि पाहा कमाल!

Hair Health | file photo

जवस

जवसामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस तुटणे कमी होते. हे हलके भाजून चपातीच्या पिठात किंवा दह्यात मिसळून खावे.

Flax Seed | (Canva Photo)

भोपळ्याच्या बिया

केस पातळ होत असल्यास रोज मूठभर भोपळ्याच्या बिया खा. यामुळे केसांची घनता वाढण्यास मदत होते.

तीळ

हिवाळ्यात केस गळणे आणि कोरडेपणा वाढतो. अशा वेळी तिळाचे लाडू किंवा चटणी खाल्ल्याने केसांचा पोत सुधारतो.

Sesame Seeds

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया टाळूला पोषण देतात. यामुळे केसांचा निर्जीवपणा दूर होऊन केसांना नवी चकाकी मिळते.

चिया सीड्स

शरीराला हायड्रेट ठेवून टाळूचा कोरडेपणा कमी करण्यासाठी चिया सीड्स उत्तम! या बिया पाण्यात भिजवून सकाळी प्याव्यात.

Chia Seeds | Pudhari

मोहरी

केवळ फोडणीसाठीच नव्हे, तर केसांच्या मजबुतीसाठी मोहरी गुणकारी आहे. कधीतरी मोहरीच्या तेलाने डोक्याला मालिश नक्की करा.

टरबुजाच्या बिया

आपण फेकून देतो त्या टरबुजाच्या बिया केसांना आतून पोषण देतात. या बिया भाजून उत्तम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

Melon | pudhari photo