पुढारी वृत्तसेवा
दुखापतींपासून बचाव आणि शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी डाएटमध्ये नक्की समाविष्ट करा हे ७ सोपे पदार्थ!
बदाम
बदाम हे प्रोटीन, व्हिटॅमिन E, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध असतात. व्यायामानंतर स्नायूंचा थकवा आणि वेदना कमी करण्यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर ठरतात.
लीन बीफ
बीफ हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, क्रिएटिन आणि उच्च दर्जाच्या प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे.
चिकन ब्रेस्ट
प्रथिनांचा आणखी एक मुख्य स्रोत म्हणजे चिकन ब्रेस्ट. त्यात व्हिटॅमिन बी, नियासिन आणि बी६ देखील भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची कार्ये सुधारण्यास मदत करू शकतात.
अंडे
अंडी प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत आहेत, जे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि रिकव्हरीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
प्रथिने अमिनो ॲसिडपासून बनलेली असतात आणि अंड्यांमध्ये या आवश्यक पोषक तत्त्वाचे प्रमाण सर्वाधिक असते.
मासा
माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि बी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ओमेगा-३ चे योग्य प्रमाण स्नायूंची ताकद आणि आकार वाढवण्यास थेट मदत करते.
शेंगदाणे
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, निरोगी फॅट्स आणि कार्ब्स यांचे योग्य मिश्रण असते. वजन आणि स्नायू वाढवण्यात अडचण येत असल्यास डाएटमध्ये शेंगदाण्यांचा समावेश करा.
गाईचे दूध गाईचे दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण आणि ताकद वाढू शकते. त्यात प्रथिने, कर्बोदके आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणात असतात, जे स्नायूंच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहेत.