पुढारी वृत्तसेवा
आयुष्यात सुखाचे दिवस असोत किंवा कठीण काळ, वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. अनेकदा मेहनतीनंतरही यश मिळत नाही, तर कधी अचानक रखडलेली कामे मार्गी लागतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, सुखाचे दिवस येण्यापूर्वी निसर्ग काही विशिष्ट संकेत देतो. आयुष्यात पुढील ७ बदल किंवा घटना घडत असतील, तर लवकरच तुमचे नशीब बदलणार आहे.
चेहऱ्यावर तेज आणि आत्मविश्वास
सकाळी उठल्यानंतर आरशात स्वतःचा चेहरा पाहताना जर तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक आत्मविश्वास आणि एक वेगळ तेज जाणवत असेल, तर हे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार असल्याचे लक्षण मानले जाते.
डावा डोळा फडफडणे
शास्त्रानुसार, पुरुषांच्या बाबतीत उजवा आणि स्त्रियांच्या बाबतीत डावा डोळा फडफडणे शुभ मानले जात असले तरी, अनेकदा डावा डोळा लवणे हे नशिबाची बदलण्याचे संकेत मानले जाते.
खर्च वाढूनही पैशांची आवक टिकणे
जर तुमचे खर्च वाढलेले असतानाही विविध मार्गांनी पैसा येत असेल आणि आर्थिक परिस्थिती स्थिर असेल, तर समजावे की तुमच्यावर लक्ष्मीची कृपा आहे.
दारात गाय येणे
जर तुमच्या घराच्या दारासमोर अचानक गाय आली, तर ते सुख-समृद्धी येण्याचे शुभ लक्षण मानले जाते.
देवाचा आशीर्वाद
देवघरात पूजा करत असताना देवाला अर्पण केलेले फूल किंवा पान अचानक तुमच्यासमोर पडले, तर तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार असल्याचे हे संकेत आहेत.
रुईचे रोपटे उगवणे
जर तुमच्या घरासमोर नैसर्गिकरित्या रुईचे रोपटे उगवले असेल, तर तुमचे नशीब बदलणार आहे असे समजावे.
भरलेले जलपात्र दिसणे
कामानिमित्त घराबाहेर पडताना पाण्याने भरलेले भांडे दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. हे धनलाभ आणि मान-सन्मान मिळण्याचे प्रतीक आहे.