Petrol Diesel Saving Tips: पेट्रोल-डिझेलची बचत कशी करावी? ५ सोप्या टिप्स!

पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. काही साध्या सवयी बदलून तुम्ही दरमहा हजारो रुपयांच्या इंधनाची बचत करू शकता.

गाडी जोरात पळवणे आणि अचानक जोरात ब्रेक लावणे यामुळे इंधन जास्त खर्च होते. नेहमी सामान्य वेगात गाडी चालवा आणि गरज असेल तेव्हाच ब्रेकचा वापर करा. यामुळे इंधन वाचेल आणि सुरक्षाही वाढेल.

ट्रॅफिक सिग्नलला ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायचे असेल, तर गाडीचे इंजिन बंद करा. गाडी उभी करून कोणाची वाट पाहत असाल, तरी इंजिन चालू ठेवू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन वाचते.

गाडीच्या वेगाप्रमाणे योग्य गिअर निवडा. चुकीच्या गिअरमध्ये गाडी चालवल्यास इंजिनवर ताण येतो आणि पेट्रोल-डिझेलचा वापर वाढतो. योग्य गिअरमुळे इंजिनचे आयुष्यही सुधारते.

कारमधील एसीमुळे इंधनाचा वापर वेगाने वाढतो. गरज असेल तेव्हाच एसी चालवा आणि तो कमी स्पीडवर ठेवा. तसेच, रहदारी टाळण्यासाठी गुगल मॅपचा वापर करा, जेणेकरून इंधन वाया जाणार नाही.

वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास गाडीचे मायलेज कमी होते. टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा आणि इंजिन ऑइल वेळेवर बदला. सुस्थितीतील गाडीला नेहमीच कमी इंधन लागते.

आठवड्यातून २-३ दिवस मेट्रो किंवा बसने प्रवास करा. ऑफिसला जाताना सहकाऱ्यांसोबत बाईक शेअरिंगचा पर्याय निवडा. यामुळे पैशांची बचत होईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल!