पुढारी वृत्तसेवा
हल्ली अनेकजण घरात कितीही महागडे बदाम खात असले, तरी दुसऱ्या क्षणी घराची चावी कुठे ठेवली हे विसरतात.
आपण सगळेच जलद आणि तल्लख बुद्धीची अपेक्षा करतो, पण त्यासाठी फक्त पौष्टिक आहार पुरेसा नाही.
तुमचा मेंदू हा एक सुपर-कंप्युटर आहे आणि त्याला चांगल्या 'हार्डवेअर'सह योग्य 'सॉफ्टवेअर'ची गरज आहे. खालील ५ सवयी तुमच्या मेंदूला AI इतके स्मार्ट बनवू शकतात, असा दावा तज्ञ करतात.
१. मेंदूला आव्हान द्या: 'सॉफ्टवेअर अपडेट' करा
मोबाईलला जसे नियमित अपडेट लागते, तसे मेंदूलाही लागते. जर तुम्ही रोज एकच काम करत राहिलात, तर मेंदू सुस्त होईल. रोज नवीन शिका.
२. 'स्लीप मोड' अत्यावश्यक: ७-८ तास झोप
थकलेला कंप्युटर जसा 'हँग' होतो, तसेच आपल्या मेंदूचेही आहे. दिवसभराची माहिती व्यवस्थित 'सेव्ह' करण्यासाठी मेंदूला झोपेची गरज असते. रोज ७ ते ८ तास शांत झोप घ्या.
३. मल्टीटास्किंग बंद; 'फोकस मोड' महत्त्वाचा
मल्टीटास्किंगमुळे मेंदू एका गोष्टीवर १००% लक्ष देऊ शकत नाही. AI प्रमाणे स्मार्ट होण्यासाठी 'सिंगल टास्किंग'ची सवय लावा. एका वेळी एकच काम पूर्ण एकाग्रतेने केल्यास तुमच्या कामाची गुणवत्ता आणि एकाग्रता वाढते.
४. शरीराची हालचाल: मेंदूचे इंधन
व्यायाम केवळ शरीर सुडौल ठेवण्यासाठी नसतो, तर तो मेंदूसाठी 'इंधना'चे काम करतो. धावणे किंवा कसरत केल्याने मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.
५. मेडिटेशनचा 'अँटी-व्हायरस' वापरा
सध्याच्या काळात तणाव आणि हजारो नकोसे विचार आपल्या मेंदूत 'व्हायरस'सारखे फिरत असतात, ज्यामुळे मेंदूची गती मंदावते. हे दूर करण्यासाठी ध्यान सर्वोत्तम 'अँटी-व्हायरस' आहे.