Herbal Tea For Digestion : गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेवर ५ गुणकारी ‘हर्बल टी’; पचनक्रिया होईल मजबूत

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात आणि सकाळी गरमागरम आल्याचा चहा पिणे शरीराला ऊर्जा देतो. हा चहा पचनास मदत करतो आणि मळमळ दूर करतो.

आल्याच्या चहामध्ये थोडी दालचिनी आणि काळी मिरी टाकल्यास त्याची चव आणि गुणधर्म आणखी वाढतात, ज्यामुळे शरीराला ऊब मिळते.

कुंडीत सहज उगवणारी लेमनग्रास आणि लिंबाचा चहा दुपारच्या वेळी पिण्यासाठी उत्तम आहे. याचा सुवास तुम्हाला ताजेतवाने आणि सक्रिय ठेवतो.

हळदीमधील 'करक्युमिन' आणि त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराला आजार आणि संसर्गापासून (Infection) वाचवतात.

हवामान बदलताना हळद आणि सुंठ (सुकलेले आले) यांचा चहा प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते आणि आजार दूर राहतात.

तेलकट किंवा मसालेदार जेवणानंतर पुदिन्याचा चहा पिल्याने गॅस आणि ॲसिडिटीपासून लगेच आराम मिळतो व पोटाला थंडावा मिळतो.

पुदिना चहामध्ये थोडे लिंबू पिळल्याने चव अधिक छान लागते आणि पचनाशी संबंधित समस्या झटपट दूर होतात.

रात्री झोपण्यापूर्वी १ कप कॅमोमाइल टी प्या. फुलांचा हलका सुगंध असलेला हा चहा मधात मिसळून घेतल्यास शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स होते.