पुढारी वृत्तसेवा
ज्योतिषशास्त्रानुसार, ३ राशी अशा आहेत ज्यांना होणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज येतो. तुमच्या राशीत आहे का ही दैवी शक्ती? जाणून घ्या.
काही लोकांना 'सिक्स्थ सेन्स' (Sixth Sense) किंवा अंतर्ज्ञानामुळे भविष्यातील घटनांचा आधीच आभास होतो. हे केवळ योगायोग नसून ग्रह-स्थितीचा परिणाम असतो.
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ही राशी अत्यंत संवेदनशील आणि भावूक असते. त्यामुळेच या राशीच्या व्यक्तींना ठिकाण किंवा व्यक्तीच्या ऊर्जेची लगेच जाणीव होते.
कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक होणाऱ्या बदलांचा पूर्वसंकेत मिळतो. त्यांना त्यांच्या मनातल्या भावनांवरून भविष्यातील घडामोडींचा वेध घेता येतो.
रहस्यमय वृश्चिक राशीचे लोक उत्तम अंतर्ज्ञानी असतात. त्यांची ग्रहणशक्ती इतर राशींच्या तुलनेत खूप तीव्र असते.
जर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी अध्यात्माची जोड घेतली, तर त्यांना केवळ भविष्यातील घटनाच नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या भूतकाळातील आणि भविष्यातील गोष्टींचेही आकलन होऊ शकते.
पूर्वाभासाच्या बाबतीत मीन राशी सर्वात पुढे मानली जाते. जलतत्त्वाच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत सहजपणे कोणत्याही परिस्थितीचे गांभीर्य ओळखू शकतात.
मीन राशीच्या लोकांना अनेकदा 'डेजा वू' (Deja Vu) चा अनुभव येतो, म्हणजेच एखादी गोष्ट घडत असताना 'हे आधीही घडले आहे' असे त्यांना वारंवार वाटते.