How to Reduce Plastic In Diet: शरीरातील प्लास्टिक रसायने ७ दिवसांत ६०% कशी कमी करावीत?

Anirudha Sankpal

प्लास्टिकचा धोका

अन्नासोबत शरीरात जाणारे प्लास्टिकचे सूक्ष्म कण आणि रसायने (BPA, फॅथलेट्स) चयापचय विकृती, हृदयविकार आणि हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरतात.

सात दिवसांत परिणाम

संशोधनानुसार, जर तुम्ही योग्य आहार घेतला, तर केवळ सात दिवसांत शरीरातील प्लास्टिक रसायनांचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत कमी करता येते.

1 - कॅन्ड फूडचा त्याग

डबाबंद (Canned) पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे, कारण डब्यांच्या आतील अस्तरातून BPA हे घातक रसायन अन्नात मिसळते.

2 - पेय पदार्थांवर मर्यादा

कॅनमध्ये मिळणारी शीतपेये किंवा इतर पेये देखील प्लास्टिक रसायनांचा मोठा स्रोत असल्याने ती पिणे टाळले पाहिजे.

3 - अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड टाळा

नाश्त्याचे सीरियल्स, कॉर्न चिप्स आणि पॅकेज केलेले स्नॅक्स हे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळावे.

दुहेरी धोका

हे पदार्थ केवळ पचनासाठीच वाईट नसतात, तर ते प्लास्टिक वेष्टनात असल्यामुळे प्लास्टिक रसायनांचा दुहेरी धोका निर्माण करतात.

प्लास्टिक पॅकेजिंग टाळा

ताज्या भाज्या किंवा फळे देखील प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेली असल्यास ती विकत घेणे टाळावे, कारण पॅकिंग उघडण्यापूर्वीच अन्नामध्ये प्लास्टिकचे अंश मिसळलेले असू शकतात.

आहारात बदल

केवळ एका आठवड्याच्या योग्य आहार निवडीमुळे तुम्ही तुमच्या शरीरावरील प्लास्टिक रसायनांचा भार निम्म्याहून अधिक कमी करू शकता.

तज्ज्ञांचा सल्ला

ही माहिती केवळ मार्गदर्शक म्हणून वापरावी. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जागरूकता

दररोज आपण नकळत प्लास्टिकच्या संपर्कात येतो, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारे आहारशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

येथे क्लिक करा