पुढारी वृत्तसेवा
इन्स्टाग्रामवर सध्या १९८० च्या दशकातील रेट्रो फोटोंचा ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे आजचे आधुनिक फोटो थेट १९८० च्या दशकातील वाटू लागतात.
फक्त नेहमीचे फिल्टर न वापरता, युजर्स एआय टूलच्या मदतीने ८० च्या दशकातील अँनालॉग कॅमेरा लूक तयार करत आहेत.
"जर ४० वर्षांपूर्वी माझा फोटो काढला असता, तर मी कसा दिसलो असतो?" या कल्पनेने युजर्सना आणि चाहत्यांना भुरळ घातली आहे.
या ट्रेंडमध्ये राजकारणीही मागे नाहीत! भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनीही आपला ८० च्या दशकातील एआय फोटो शेअर केला आहे.
समंथा रुथ प्रभू, त्रिशा आणि साई पल्लवी यांसारख्या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रींना ८० च्या दशकातील नायिकांच्या रूपात री-क्रिएट केले जात आहे.
त्यांच्या नेहमीच्या आधुनिक फॅशन आणि ग्लॅमरस फोटोशूटऐवजी, या एआय फोटोंमध्ये त्या एखाद्या जुन्या कॉलेज ड्रामामधील हिरोईनसारख्या दिसत आहेत.
हे फोटो पहिल्यांदा पाहिल्यावर एखाद्या जुन्या चित्रपटाचा सेट किंवा कॉलेज अल्बममधील खरेखुरे फोटो असल्याचा भास होतो.
एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचेही ८० च्या दशकातील लूकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या एआय फोटोंमध्ये ८० च्या दशकातील वॉर्म लायटिंग, सॉफ्ट फोकस, फिल्म ग्रेन आणि जुन्या कॅमेऱ्याचे खास टेक्सचर पाहायला मिळत आहे.