Child Height Tips : मुलांची उंची वाढवायचीये? डाएटमध्ये ‘या’ ११ सुपरफूड्सचा करा समावेश

रणजित गायकवाड

पालकांनो, मुलांची उंची केवळ जीन्सवर नाही, तर त्यांच्या योग्य आहारावरही अवलंबून असते. मुलांच्या उत्तम वाढीसाठी त्यांच्या डाएटमध्ये सुपरफूड्सचा समावेश करणे गरजेचे आहे.

हाडांच्या मजबुतीसाठी आणि विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. मुलांच्या हाडांना ताकद देण्यासाठी रोज किमान दोन ग्लास दूध नक्की द्या, ज्यातून भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन-डी मिळते.

दुधासोबतच दही आणि पनीर हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहेत. यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते आणि त्यांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळून उंची वाढण्यास मदत होते.

अंड्यामध्ये प्रोटीन, रिबोफ्लेविन आणि बायोटिन सारखे घटक असतात. रोज एक उकडलेले अंडे खाल्ल्याने मुलांच्या शरीराचा आणि हाडांचा विकास वेगवान होतो.

नॉन-व्हेज खाणाऱ्या मुलांसाठी चिकन हा प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात आणि हाडांची घनता वाढते.

पालक, मेथी, ब्रोकोली आणि कोबी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन-के, कॅल्शियम आणि आयर्न भरपूर असते. या भाज्या मुलांची उंची वाढवण्यास अत्यंत गुणकारी ठरतात.

जर तुमचे मूल शाकाहारी असेल, तर सोयाबीन आणि सोया चंक्स हा प्रोटीनचा खजिना आहे. यामुळे शरीराची एकूण ग्रोथ उत्तम होते.

बदाम आणि अक्रोड यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि हेल्दी फॅट्स असतात. हे केवळ मुलांची उंचीच वाढवत नाहीत, तर त्यांच्या बौद्धिक विकासासाठीही फायदेशीर ठरतात.

भोपळ्याच्या आणि अळशीच्या बिया यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. या बिया मुलांच्या हाडांना आतून मजबूत करतात.

फक्त अन्नच नाही, तर भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य हायड्रेशनमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि ग्रोथ हार्मोन्स नीट काम करतात.

योग्य आहारासोबतच मुलांची पुरेशी झोप आणि मैदानी खेळ (सायकलिंग, पोहणे किंवा लटकणे) अत्यंत आवश्यक आहेत. आजपासूनच त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये हा बदल करा