पुढारी वृत्तसेवा
ॲमेझॉन जंगल : जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन, हे बाझील, पेरू यासह अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. कोट्यवधी भयंकर जीव-जंतू राहतात.
तैगा जंगल : ते आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेपर्यंत 1 कोटी 20 लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलंय,उत्तर धुवाजवळ असल्यामुळे ते खूप थंड असते.
कांगो जंगल : या आफ्रिकेतील जंगलात 500 हून अधिक प्रकारचे प्राणी आढळतात. येथील नदीत पिराना सारखे धोकादायक मासे आढळतात.
सुंदरबन जंगल : भारत आणि बांगला देशच्या दरम्यान पसरलेला हा भाग गंगा आणि बह्मपुत्रा नदीचा डेल्टा प्रदेश आहे. येथे वाघ आणि अनेक भयंकर जंगली प्राणी आढळतात.
डेंट्री जंगल : ऑस्ट्रेलियामध्ये स्थित, हे जंगल जगातील सर्वात विषारी वनस्पती आणि झाडांचे घर आहे.
वाल्डिवियन जंगल : दक्षिण अमेरिकेत पसरलेले हे जंगल ‘पर्जन्यवन’ म्हणून ओळखले जाते. दुर्मीळ प्रजातींच्या वनस्पती आढळतात, ज्या जगात इतरत्र कुठेही नाहीत.
टोंगास जंगल : उत्तर अमेरिकेतील अलास्कामध्ये पसरलेले हे जंगल येथे 32 आदिवासी गटांचे जवळपास 75,000 हून अधिक लोक राहतात.
किनाबालू जंगल : मलेशियाचे हे जंगल युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. हे डिस्नेलँडप्रमाणे सुंदर, पण खूप भयानक आहे.
उष्णकटिबंधीय जंगल : चीनचे हे 2,400 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले जंगल जैव-संतुलनासाठी खूप महत्त्वाचे आहे. वनस्पतिशास्त्रज्ञांसाठी हे स्वर्ग आहे.