पुढारी वृत्तसेवा
फॅटी लिव्हरची लक्षणे सुरुवातीला ओळखणे कठीण असते, कारण ती सौम्य असू शकतात.
प्रत्येक व्यक्तीची शरीररचना आणि 'लिव्हर मेटाबॉलिज्म' (यकृताची चयापचय क्रिया) वेगळी असते, त्यामुळे लक्षणेही भिन्न असू शकतात
सतत थकवा जाणवणे आणि थोड्याशा कष्टानेही गळून जाणे हे फॅटी लिव्हरचे एक प्राथमिक लक्षण मानले जाते.
पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला वेदना होणे किंवा तिथे जडपणा जाणवणे हे यकृतावर सूज असल्याचे लक्षण असू शकते.
भूक कमी लागणे आणि जेवणाची इच्छा न होणे याकडे दुर्लक्ष करू नका.
काही रुग्णांना अचानक वजन कमी होणे किंवा सतत मळमळल्यासारखे वाटणे अशा समस्या जाणवतात.
त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागल्यास ते यकृताच्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात.
यकृताच्या आरोग्यासाठी योग्य वेळी पाणी पिणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच हिताचे ठरते.