Unseasonal Rain: कुठे पत्रे उडाले... तर कुठे झाडे पडली! अवकाळीने अनेकांचा संसार उघड्यावर

पुढारी वृत्तसेवा

अहिल्यानगर शहरातील बहुतांश भागात पाण्याचे तळे साचले होते.

वादळी वार्‍यामुळे घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडाली आहेत. या पावसामुळे बाजरी, भाजीपाला तसेच आंबा व डाळिंब फळबागांचे नुकसान झाले आहे

घरावर झाडाची मोठी फांदी पडून नुकसान झाले

शेवगाव रोडवर दुचाकी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात कोसळली

एका घरावर पिंपळाच्या झाडाची फांदी पडून पत्र्याचे नुकसान झाले. गल्लीबोळांमध्ये पडलेल्या फांद्यांमुळे अडथळे निर्माण झाले.

वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. भोरवाडीत शेतकर्‍यांच्या कांदा चाळीवरील पत्रे वादळी वार्‍यामुळे उडाल्याने चाळीतील पूर्ण कांदा पावसाने भिजला