पुढारी वृत्तसेवा
रवा किंवा धान्याला लवकर अळी लागते? काळजी करू नका. किचनमधील साहित्याचा वापर करून तुम्ही धान्य वर्षभर सुरक्षित ठेवू शकता. जाणून घ्या ४ उपाय.
रव्याच्या डब्यात कडूनिंबाची ५-६ कोरडी पाने टाकून ठेवा. कडूनिंबाच्या कडू वासामुळे अळ्या आणि कीटक धान्याला स्पर्शही करत नाहीत.
धान्यामध्ये लवंग टाकल्याने कीटक दूर पळतात. जर लवंग उपलब्ध नसेल, तर तुम्ही दालचिनी किंवा तमालपत्राचा वापर देखील करू शकता. हे नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करतात.
रवा किंवा धान्य बाजारातून आणल्यानंतर किंवा उन्हात वाळवल्यानंतर ते लगेच हवाबंद डब्यात भरून ठेवा. हवेतील संपर्कामुळे कीड लागण्याची शक्यता जास्त असते.
धान्य नेहमी ओलावा किंवा आद्रतेपासून दूर ठेवा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कधीही ओला हात डब्यात घालू नका. ओलाव्यामुळे धान्याला बुरशी आणि अळ्या लवकर लागतात.
या सोप्या टिप्स वापरल्या तर तुमचे धान्य आणि रवा नेहमी ताजे आणि किडमुक्त राहील.
रसायनांऐवजी हे नैसर्गिक उपाय नक्की करून पहा!