shreya kulkarni
तज्ज्ञांच्या मते, शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि संतुलित आहार हाच सर्वोत्तम मार्ग आहे. मल्टीविटामिन गोळ्या या आहाराला पर्याय ठरू शकत नाहीत.
नैसर्गिक अन्नातून जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा नैसर्गिक समतोल मिळतो, जो शरीर सहजपणे शोषून घेते. गोळ्यांमध्ये हे सर्व घटक एकत्र मिळत नाहीत.
अनेकदा, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतलेल्या मल्टीविटामिन गोळ्या शरीर शोषून घेत नाही आणि त्या लघवीवाटे बाहेर टाकल्या जातात. काहीवेळा जास्त डोसमुळे शरीराला नुकसानही होऊ शकते.
तुमच्या जेवणाच्या ताटात विविध रंगांच्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि सुका मेवा यांचा समावेश करून तुम्ही शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वे नैसर्गिकरित्या देऊ शकता.
पालक, मेथी, शेपू यांसारख्या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्ताची कमतरता आणि हाडांच्या समस्या दूर राहतात.
संत्री, मोसंबी, आवळा, पेरू यांसारख्या फळांमधून व्हिटॅमिन सी मिळते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
बदाम, अक्रोड, जवस आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् असतात. हे त्वचा, केस आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
जेव्हा शरीरात एखाद्या विशिष्ट पोषक तत्त्वाची तीव्र कमतरता असेल किंवा काही आजारपणात, तेव्हाच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन घ्याव्यात. स्वतःच्या मनाने गोळ्या घेणे टाळा.