अमृता चौगुले
त्वचा असो किंवा इतर विकार जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पण शरीराला नेमकी पाण्याची गरज किती असते ही तुम्हाला माहिती आहे का ?
घाम, युरीन, अश्रु, थुंकी यातून शरीरातील पाणी बाहेर जात असते. अशावेळी शरीराच्या चलनवलनासाठी आवश्यक असलेले पाण्याचे प्रमाण कायम राखणे गरजेचे असते.
शरीरात जवळपास 60 टक्के पाणी असते. त्यातही महिलांना दिवासभरातून दोन लीटर पाण्याची गरज असते. तर पुरुषांना दिवासभराटतून अडीच लीटर पाण्याची गरज असते.
शरीरातून अतिरिक्त पाणी बाहेर पडले तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. या परिस्थितीत हार्ट बीट वाढणे अशी परिस्थिति येते. परिस्थिति अधिक गंभीर झाल्यास अनेकदा अवयव काम करणे बंद करून टाकतात.
याउलट पाणी जास्त पिल्याने हायपोनेट्रेमिया होण्याची शक्यता वाढते. यामध्ये सोडियमचे प्रमाण धोकादायकरित्या कमी होते. यामुळे भ्रम होणे, डोकेदुखी हे त्रास उद्भवतात.