गोवा : नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गोव्यात नरकासुरांचे राज्य असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. नरकचतुर्दशी दिवशी पहाटेला अंधाराचे प्रतीक मानला जाणाऱ्या, अक्राळविक्राळ अशा या नरकासुराचे दहन करून प्रकाशाचा अंधारावर, चांगल्याचा वाईटावर आणि सकारात्मकतेचा नकारात्मकतेवर विजय साजरा करण्यात येतो.
पणजीत जागोजागी नरकासुराच्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
नरकासुर प्रतिमा बनवण्याची तयारी युवा मंडळातर्फे साधारण महिना भरापूर्वीपासूनच सुरू होते.
रविवारी अनेक ठिकाणी डीजे लावण्यात आले होते तर काही ठिकाणी युवकांनी या संगीताच्या तालावर ठेकाही धरलेला आहे.
नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी नागरिक संध्याकाळपासून बाहेर पडले आहेत.
यामुळे पणजीतील जवळजवळ सर्वच रस्ते वाहने आणि पाहणाऱ्यांच्या गर्दीने तुडुंब भरले आहेत.
पणजीतील ताळगाव, सांत इनेज, मळा, रायबंदरपर्यंत लोक प्रतिमा पाहण्यासाठी येत आहेत.
पौराणिक कथेप्रमाणे, नरकासुर या राक्षसाने पृथ्वीवर तसेच स्वर्गात अराजकता माजवली होती. त्याच्या दुष्ट कृत्यांमुळे त्रस्त होऊन, भगवान कृष्णाने त्याचा वध केला.
गोव्यात दरवर्षी नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला तयार केलेल्या नरकासुर प्रतिमा रस्त्याशेजारी ठेवल्या जातात.
नरक चतुर्दशी दिवशी पहाटे त्यांचे दहन केले जाते.
नरक चतुदर्शीच्या पहाटे या प्रतिमा दहन करण्यात लोक उत्साहाने सहभागी होतात
नरकासुराचे दहन करून प्रकाशाचा अंधारावर, चांगल्याचा वाईटावर आणि सकारात्मकतेचा नकारात्मकतेवर विजय साजरा करण्यात येतो
नरकासुराची प्रतिमा या अक्राळविक्रार व भव्य असतात