विश्वसंचार

तब्बल 3 कोटी वर्षांपूर्वीचा सागरी दैत्य!

Shambhuraj Pachindre

लीमा : पुरातत्त्व संशोधकांनी एका 'सागरी दैत्य' ठरेल अशा जलचराची कवटी शोधून काढली आहे. आधुनिक व्हेल माशांचा हा पूर्वज होता जो प्रागैतिहासिक काळात महासागरांमध्ये राहत असे. सध्याच्या पेरूजवळील भागात हे जलचर मोठ्या प्रमाणात होते. तब्बल 3 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीच्या या सागरी दैत्याची कवटी पेरूच्या दक्षिणेकडील ओकुकाजे वाळवंटात सापडली आहे.

पेरूच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सॅन मार्कोसमधील जीवाश्म संशोधक रोडोल्फो सालास यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या जलचराच्या कवटीमध्ये त्याचे लांब आणि टोकदार दातही आहेत. हा एक प्राचीन काळातील सस्तन प्राणी होता ज्याचे नाव होते 'बोसिलोसॉरस'. जलचर 'सिटासियन' परिवाराचा तो एक भाग होता. त्याच्या समकालीन वंशजांमध्ये व्हेल, डॉल्फिन आणि पोरपोइज हे आहेत. 'बेसिलोसॉरस'चा अर्थ आहे 'किंग लिजार्ड'. हा एक सरीसृप नसला तरी आपल्या लांब शरीरामुळे तो पाण्यातून जात असताना एखाद्या सापासारखी हालचाल करीत असे. तो प्रागैतिहासिक काळातील एक खतरनाक शिकारी होता. तो तब्बल बारा मीटर म्हणजेच 39 फूट लांबीचा होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT