विश्वसंचार

दहा कोटी वर्षांपूर्वीचा किडा होता स्क्रब ब्रशसारखा!

Pudhari News

लंडन : म्यानमारच्या उत्तरेकडील हुकावांग दरीत संशोधकांना दहा कोटी वर्षांपूर्वीचे एक अंबर सापडले होते. या अंबरमध्ये त्या काळातील एका किड्याचे शरीर होते. हा किडा एखाद्या चालत्या-फिरत्या स्क्रब ब्रशसारखा होता असे संशोधकांनी म्हटले आहे.

या प्रजातीला संशोधकांनी 'स्टेगास्टोचलिडस सॅरेमचीएना' असे नाव दिले आहे. हा किडा झाडावरील शैवाल किंवा बुरशीमध्ये राहत असावा असे संशोधकांना वाटते. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीतील पॅलिओबायोलॉजिस्ट जॉर्ज पोईनर यांनी याबाबतची माहिती दिली. झाडांवरील शैवालामधून वावरण्यासाठी योग्य असे त्याचे शरीर होते. हा किडा 4.2 मिलीमीटर लांबीचा होता. त्याच्या डोक्याच्या मागे लगेचच पायांना सुरुवात होत होती. त्याचे डोके व पाठीवर अनेक काटे होते. शैवाल किंवा बुरशीमधून वावरत असताना त्याला या काट्यांची मदत होत असे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT