सुनीताने तिथे जिम्नॅस्टिक करून ऑलिम्पिक खेळाडूंना आता शुभेच्छा दिल्या आहेत. Pudhari File Photo
विश्वसंचार

जिम्नॅस्टिक करून सुनीताच्या ऑलिम्पिक शुभेच्छा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अंतराळ स्थानकात अंतराळवीर हे सहा-सहा महिन्यांसाठी आलटून पालटून राहात वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सही यापूर्वी अंतराळ स्थानकात दीर्घकाळ राहिलेली आहे. आता काही दिवसांसाठीच ती आपल्या एका सहकार्‍यासह अंतराळ स्थानकात गेली होती. पण यानातील तांत्रिक बिघाडामुळे ती अद्याप तिथेच आहे. गेल्या 52 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ‘अडकलेल्या’ सुनीताने तिथे जिम्नॅस्टिक करून ऑलिम्पिक खेळाडूंना आता शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनीता पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंना शुभेच्छा

पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंना ती शुभेच्छा देत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सुनीता इतर अंतराळवीरांसोबत ऑलिम्पिकची मशाल हातात धरताना दिसत आहे. तथापि, ही वास्तविक टॉर्च नसून तिचे विद्युत रूप आहे. व्हिडीओमध्ये सर्व अंतराळवीर वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेताना दिसत आहेत. एकीकडे सुनीता जिम्नॅस्टिक करत असताना दुसरीकडे अंतराळवीर भारोत्तोलन, रेस, डिस्कस थ्राे, शॉट पुट अशा अनेक खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी, सर्व अंतराळवीरांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार्‍या सहभागींना शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली, गेल्या काही दिवसांत आम्हाला ऑलिम्पिक खेळाडूंप्रमाणे खेळताना खूप मजा आली. मात्र, इथे गुरुत्वाकर्षण नसल्याचा आम्हाला फायदा झाला. अशा परिस्थितीत ऑलिम्पिक खेळाडूंसाठी किती कठीण असेल याची आपण कल्पना करू शकतो. आम्ही सर्व सहभागींना यशासाठी शुभेच्छा देतो. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने त्यांचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे यान अनेक वेळा मोहीम पुढे ढकलल्यानंतर अखेर 5 जून 2024 रोजी अवकाशात झेपावले. सुमारे 25 तासांनंतर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या. मिशन अंतर्गत, त्यांना संशोधन आणि प्रयोग करण्यासाठी 8 दिवस अंतराळ स्थानकात राहून 13 जून रोजी पृथ्वीवर परतण्याची योजना होती. परंतु त्यांच्या अंतराळ यानाला पुन्हा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. सुनीता आणि त्यांचे साथीदार बुश बिलमोर त्यावेळेपासून अंतराळ स्थानकावरच आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT