धातूसारखा दिसणारा हा दगड अगदी सोन्यासारखाच मौल्यवान. Pudhari File Photo
विश्वसंचार

आहे दगड; पण सोन्यासारखाच मौल्यवान!

पुढारी वृत्तसेवा

डरहॅम : सध्या संपूर्ण जग अक्षय ऊर्जेच्या (रिन्यूएबल एनर्जी) वापरासाठी आग्रह धरत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात अक्षय ऊर्जेचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतदेखील यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक बॅटरी हे दोन घटक या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत. अक्षय ऊर्जेच्या वापरामुळे एका विशिष्ट धातूची मागणी वाढण्याची शक्यता आहे. जस्त (झिंक) असे या धातूचे नाव आहे. इंटरनॅशनल झिंक असोसिएशनने याबाबत सविस्तर माहिती दिली. यानुसार, धातूसारखा दिसणारा हा दगड अगदी सोन्यासारखाच मौल्यवान आहे. ग्रीन एनर्जी आणि बॅटरी टेक्नॉलॉजीसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमुळे 2030पर्यंत भारतातील झिंकच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, असेही यात नमूद केले गेले आहे.

झिंकच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

झिंक असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, पुढच्या पाच वर्षांत एनर्जी स्टोरेज सोल्युशन्समध्ये सातपट वाढ होण्याची शक्यता आहे. जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी झिंकच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतातल्या विक्रमी पोलाद उत्पादनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या जलद गतीने होणार्‍या विकासासाठी झिंक महत्त्वाचे आहे. त्यामुळे झिंकच्या किमतीत वाढ होण्याची संधी निर्माण झाली आहे. आयझेडएने सांगितलं, की इन्फ्रा प्रकल्पांमध्ये झिंकचा समावेश केल्यास अ‍ॅन्युअल कोरोजन कॉस्ट लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. हा खर्च सध्या भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे पाच टक्के आहे. एखादा उद्योग किंवा व्यक्ती त्याच्या उत्पादनांचे गंजापासून संरक्षण करण्यासाठी किंवा गंज कमी करण्यासाठी खर्च केलेल्या रकमेला करोजन कॉस्ट म्हणतात. धातूला गंज चढण्यापासून वाचवण्यासाठी केलेल्या उपायांकरिता आलेला खर्च आणि गंजाची किंमत यांचा त्यात समावेश होतो.

झिंक फोटोव्होल्टाइक पेशींची कार्यक्षमता वाढवण्यास मदत

झिंक फोटोव्होल्टाइक पेशींची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. सौर ऊर्जा प्रक्रियेतदेखील याचा उपयोग होतो. सोलर पॅनेलमध्ये वापरल्या जाणार्‍या स्टीलवर झिंक कोटिंग केले जाते. यामुळे कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीत उभ्या असलेल्या पॅनेलचे आयुष्य वाढते. झिंक वापरून बनवलेल्या बॅटरीची एनर्जी डेन्सिटी खूप जास्त असते. त्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ शकतात. शिवाय अशा बॅटरीज स्वस्तदेखील आहेत. या बॅटरीमध्ये पवन आणि सौर ऊर्जा साठवता येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT