चंद्रावर 12 कोटी वर्षांपूर्वी व्हायचे ज्वालामुखींचे विस्फोट! Pudhari File Photo
विश्वसंचार

चंद्रावर 12 कोटी वर्षांपूर्वी व्हायचे ज्वालामुखींचे विस्फोट!

पुढारी वृत्तसेवा

लँकेस्टर : चंद्रावर जवळपास 12 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचे विस्फोट होत असत, असे एका नव्या संशोधनातून आढळून आले आहे. चीनने अंतराळातून आणलेल्या मातीच्या नमुन्याच्या आधारावर याचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चांग-ई 5 या चीनच्या अंतराळ यानाने चंद्रावरील माती आणली होती. या मातीत दोन अब्ज जुन्या लावाचाही समावेश आहे. या लावाच्या माध्यमातून चंद्रावरील ज्वालामुखींची हालचाल आढळून आली. अर्थात, 2 अब्ज वर्षांपूर्वींपर्यंतच हा प्रकोप होता. नंतर तो संपुष्टात आला, असा दावा यात करण्यात आला आहे.

चंद्राच्या अंतर्गत भागातील काही क्षेत्रात ज्वालामुखीचे संकेत

चांग ई 5 अंतराळ यान ज्या क्षेत्रात उतरले, त्याला ‘ओशनस प्रोसेलरम’ असे म्हटले जाते. याचा अर्थ तुफानांचा महासागर असा होतो. हे क्षेत्र चंद्राच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अडीच हजार किलोमीटर्सपर्यंत विस्तारलेले आहे. या क्षेत्रात आताही काही प्रमाणात नवा लावा अस्तित्वात आहे आणि यामुळे तेथे ज्वालामुखी असण्याचे संकेत मिळतात, असे संशोधकांचे मत आहे. आतापर्यंत शुक्रावर ज्वालामुखी सक्रिय असल्याचे अनेकदा आढळून आले असल्याचे अनेक अभ्यासातून आढळून आले आहे. याशिवाय, मंगळावर विवरांची संख्या मोजून मोठ्या लावांची निर्मिती केव्हा झाली असेल, याचा शोध लावता येऊ शकतो, असाही संशोधकांचा दावा आहे. आतापर्यंतच्या अभ्यासातून चंद्राच्या अंतर्गत भागातील काही क्षेत्रात ज्वालामुखी सक्रिय असल्याचे संकेत मिळाले आहेत, हे देखील येथे उल्लेखनीय आहे.

चंद्रावर प्राचीन ज्वालामुखीचे अनेक पुरावे

यादरम्यान, चीनच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सचे प्रो. युयांग यांनी चंद्रावर प्राचीन ज्वालामुखीचे अनेक पुरावे मिळाले असल्याचा येथे पुनरुच्चार केला. हे ज्वालामुखी किती काळ सक्रिय राहिले असतील, याचा अंदाज लावणे मात्र कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. चांग ई 5 यानातून जे नमुने आणले गेले त्यात काचेच्या 3 हजार मोत्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी येथे सांगितले. त्याची रचना, ट्रेस-सत्व संरचना आणि ईन-सिटू सल्फर आयसोचटोपच्या विश्लेषणाच्या माध्यमातून ज्वालामुखीवर संशोधन केले गेले असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. चांग ई 5 या यानाने डिसेंबर 2020 मध्ये चंद्रावरून जवळपास 1731 ग्रॅम नमुने आणले होते. या यानाने त्यावेळी चंद्राच्या पटलावरील 100 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाचाही यशस्वी सामना केला. यातून आणलेले नमुने हे नासाच्या मानवरहित लूना मिशनच्या नमुन्याच्या तुलनेत 1 अब्ज वर्षे जुने आहेत, हे देखील लक्षवेधी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT