पाण्याच्या साक्षीने लग्न पार पडते.  Pudhari File Photo
विश्वसंचार

अग्नी नाही तर पाण्याच्या साक्षीने पार पडते लग्न

पुढारी वृत्तसेवा

छत्तीसगड : भारतातील प्रत्येक राज्यात विविध भाषा, परंपरा पहायला मिळतात. अशाच प्रकारे लग्नकार्याची परंपरा सुद्धा अनेक भागांत वेगवेगळी असते. देशातील बहुसंख्य ठिकाणी अग्नीला साक्षी मानत विवाह सोहळा होतो, पण भारतातील अशी एक जागा आहे जिथे अग्नीला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे विधी होतात.

लग्नसमारंभात होणारा वायफळ खर्च रोखण्यासाठी ही परंपरा

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये ही परंपरा सुरू आहे. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. येथील आदिवासी समाज नेहमीच निसर्गाची पूजा करतो. लग्नसमारंभात होणारा वायफळ खर्च रोखण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांनी ही परंपरा सुरू केली आहे. छत्तीसगडमधील हा समाज केवळ विवाहातच नाही तर सर्व शुभ कार्यात पाण्याला साक्षी म्हणून विधी करतात. हा समाज पाण्याला आपली आई मानतो. त्यामुळे हे नागरिक पाण्याला खूप महत्त्व देतात. धुर्वा समाज हा बस्तर येथील रहिवासी आहे. धुर्वा समाजाची जुनी पिठढी कांकेर नदीच्या पाण्याला साक्षी मानून सर्व शुभ कार्य करतात. हे नागरिक आजही काकेर नदीतून पाणी आणतात आणि नवविवाहित जोडप्यावर शिंपडतात. त्यानंतर लग्नाचे विधी पूर्ण करतात.

पाण्याला साक्षी मानून लग्नाचे विधी पूर्ण करतात

भारतीय लग्नकार्यात वधू आणि वर हे अग्नीला साक्षी मानत सात फेरे घेतात. त्यानंतर विवाहाचे विधी पूर्ण होतात, पण भारतातील या समाजात अग्नीला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे विधी पूर्ण करतात. ही परंपरा आदिवासी समाजाची असून शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आदिवासी समाजाने नेहमीच जल, जंगल आणि जमीन यांची पूजा केली आहे. आदिवासी समाजातील जे नागरिक पाण्याला साक्षी मानून विवाह सोहळा पार पाडतात ते धुर्वा समाजाचे असतात. पाणी हे जीवन देणार्‍या पवित्र देवतेसारखे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नात वापरण्यात येणारे पाणी हे खूप खास असते. हे पाणी बस्तरमध्ये वाहणार्‍या कांकेर नदीचे आहे. दुर्वा समाजात कांकेर नदी अतंयंत पवित्र मानली जाते. या समाजात या नदीच्या पाण्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण मानले जात नाही. या भागातील नागरिक हे लग्नात वधू-वर यांच्यासोबत संपूर्ण गावात फेर्‍या मानतात. तसेच हुंडा म्हणून काहीही घेतले जात नाही. ही परंपरा कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात सर्वजण एकवटतात आणि दंड ठोठावला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT