विश्वसंचार

मौल्यवान सोन्यापेक्षाही महागडी आहे ही भाजी

Pudhari News

नवी दिल्ली : तसे पाहिल्यास 'सोने' हे एक मौल्यवान धातूंपैकी एक महागडा धातू आहे. मात्र, जगात अशी एक भाजी आहे की ती पिवळ्या धातूपेक्षाही महागडी आहे. या भाजीचे नाव 'हॉप शूटस्' असे आहे. ही भाजी जर एक किलो खरेदी करावयाची असेल तर तुम्हाला 80 ते 82 हजार रुपये मोजावे लागतात. 

'हॉप शूटस्' असे नाव असलेली ही भाजी इतकी महागडी कशी काय असू शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. महाग असण्याचे कारणही तसेच आहे. या भाजीत मोठ्या प्रमाणात औषधी गुण आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे अँटिबायोटिक आढळून येतात. याशिवाय या भाजीचा उपयोग अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी होतो. ही भाजी दातांमध्ये येणार्‍या वेदना आणि टीबीवरील उपचारासाठी अत्यंत उपयोगी आहे. ही भाजी काही लोक सॅलड म्हणूनही खाणे पसंद करतात. 

'हॉफ शूटस्' भाजीच्या फुलाचा वापर बियर बनविण्यातही होतो. आठव्या शतकादरम्यान या भाजीला बियरमध्ये घालून पिण्यात येत होते. ही पद्धत आजही अस्तित्वात आहे. या महागड्या भाजीच्या शेतीस सर्वप्रथम उत्तर जर्मनीत सुरुवात झाली. त्यानतंर ही शेती जगभरात करण्यात येऊ लागली. 

लोक या भाजीला कच्चे खाणेही पसंद करतात. यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. जर्मनीत तर या भाजीचे लोणचेही घालतात. या देशात ही भाजी अत्यंत लोकप्रिय असून ती चवीने खाल्ली जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT