भावी सून आपली हरवलेली मुलगीच आहे लग्नमंडपात समजलं. Pudhari File Photo
विश्वसंचार

लग्नमंडपात समजलं, भावी सून आपली हरवलेली मुलगीच!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : लग्नसोहळ्यात सुनेच्या रूपात मुलगी आणि जावयाच्या रूपात मुलगा मिळतो. सासू सुनेचं नातं तसं बदनामच...पण काळ बदलला आहे. आता सून ही पण मुलगी असते. आता एका लग्नाची अजब गोष्ट समोर आली आहे. सासू आपल्या लेकासाठी सून आणायला गेली आणि हे काय तिला कळलं की, ही आपली हरवलेली मुलगीच आहे. आता मुलगा आणि मुलीचे लग्न कसं होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...यात पण एक ट्विस्ट आहे. कुठे घडला हा विचित्र प्रकार आणि पुढे नेमकं काय झालं पाहूयात.

हातावरील खूण पाहून भावी सून हरवलेली मुलगीच असल्याचं कळालं

ही घटना चीनमधील एका लग्नात घडली. होणारी सून ही मुलगी असल्याच सासूला कळल्यानंतर त्याला जबरदस्त धक्का बसला. लेकाचं लग्न म्हटलावर वरमाय अगदी आनंदात होती. घरात एका सुनेच्या रूपात मुलगी येणार असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. वाजतगाजत वरात नवरी मुलगीकडे पोहोचली. तिथेही लग्नाची लगबग सुरू होती. जशी वरात सुनेच्या दारी पोहोचली तशी होणारी सून सासू आणि नवरदेवाच्या स्वागतासाठी स्वत: हजर झाली. त्यावेळी होणारी सून पाहून सासूच्या चेहर्‍यावर आनंद होता. पण, त्यावेळी वरमायचे लक्ष वधूचा हातावरील एका खूणकडे गेलं. त्यावरून सासूला भूतकाळातील गोष्ट आठवली. सासूने सुनेच्या घरातील मंडळींना तिच्याबद्दल विचारपूस सुरू झाली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. लग्नाच्या दिवसापर्यंत सासूला आपल्या सुनेच हे सत्य माहिती नव्हतं.

20 वर्षांपूर्वी हरवली हाेती मुलगी

नवरीच्या आई-वडिलांनी सांगितलं की, त्यांना ही मुलगी रस्त्याच्या कडेला सापडली होती. त्यानंतर आम्ही तिला दत्तक घेतलं आणि लहानचं मोठं केलं. त्यानंतर वरमायने 20 वर्षांपूर्वी आपली मुलगी हरवली होती आणि ती मुलगी हीच आहे, तिच्या जन्म खुणावरून ही सिद्ध होतं. ते कळल्यावर सगळ्यांना एकच धक्का बसतो. खास करून नवरी मुलगी आणि मुलगा यांना. होणारी सासू आपली आई आहे,असे या तरुणीला समजले आणि तिचीर‘अश्रुनीर वाहे डोळा’ अशी अवस्था झाली. या आनंदाची बातमीसोबत आता लग्न कसं होणार हा प्रश्न होता. पण, थांबा ही कहाणी इथेच संपत नाही. यानंतरही त्या दोघांचं लग्न झालं. झालं असं की, या दोन्ही कुटुंबाने एकमेकांपासून काही गोष्टी लपवल्या होत्या. जशी नवरी मुलगी ही त्या कुटुंबातील दत्तक मुलगी होती. तशीच नवर्‍या मुलाच्या आईने आपली मुलगी हरवल्यानंतर एक मुलगा दत्तक घेतला होता. तोच हा नवरा मुलगा होता. अखेर दोघांनाही दत्तक घेतले असल्याने त्यांच्यात पूर्वीचे कोणतेही नाते नव्हते हे निश्चित झाले आणि मग या दोघांचे लग्न मोठ्या लावण्यात आले. चिन्यांच्या देशात काहीही घडू शकते!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT