विश्वसंचार

पाच हजार वर्षांपूर्वीच्या मेंदू शस्त्रक्रियेचा सापडला पुरावा

Pudhari News

मॉस्को : रशियन संशोधकांना तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीची एक मानवी कवटी सापडली आहे. तिच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की या व्यक्‍तीवर त्या काळात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. क्रिमियामध्ये ही कवटी सापडली आहे.

त्या काळात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसावी व या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असावा असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांनी या कवटीची थ्रीडी छायाचित्रे काढली असून त्यानुसार हा माणूस वीस ते तीस वर्षे वयोगटातील होता. त्याच्या कवटीत ट्रेपॅनेशन शस्त्रक्रिया करून घेण्यात आली होती. या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी त्यावेळी रुग्णाच्या कवटीत एक छिद्र केले जात असे. कॉन्टेक्चुअल अँथ्रोपोलॉजी लॅबोरेटरीच्या प्रमुख डॉ. मारिया डोब्रोव्होल्स्काया यांच्या म्हणण्यानुसार हे स्पष्ट आहे की हाडांच्या पृष्ठभागावर ट्रेपॅनेशनचे संकेत स्पष्ट दिसतात. इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजी ऑफ द रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सच्या वैज्ञानिकांनी सांगितले की या पुरातन डॉक्टरांकडे शस्त्रक्रियेसाठी कदाचित दगडी हत्यारे असावीत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार मेंदूच्या शस्त्रक्रियेचा उपयोग त्यावेळी गंभीर डोकेदुखी, हेमाटोमा, डोक्याच्या जखमा किंवा अपस्मार या आजारावरील उपचारासाठी केला जात होता. अशा शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्ण बचावतही होते हे विशेष.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT