विश्वसंचार

लवकर नाश्ता केल्याने घटतो मधुमेहाचा धोका

Pudhari News

वॉशिंग्टन : तुम्हाला मधुमेहापासून स्वत:चा बचाव करावयाचा असेल, तर सकाळी लवकर नाश्ता करण्याची सवय लावून घ्या, असा सल्ला अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार रोज सकाळी सुमारे साडेआठ वाजण्यापूर्वी नाश्ता केल्यास 'टाईप-2' डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो. 

या संशोधनात असे आढळून आले की, सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वीच नाश्ता करणार्‍या लोकांमध्ये ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि टाईप-2 डायबिटीसचा धोकाही कमी करण्यास मदत मिळते. सुमारे 10 हजार 575 वयस्क लोकांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील संशोधक मरयम अली यांनी यासंदर्भात सांगितले की, सकाळी वेळेत नाश्ता करणार्‍या लोकांमध्ये ब्लड शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते. यामुळे मधुमेहाचा संभाव्य धोका टाळण्यास मदत मिळते.

इन्सुलिन प्रतिरोध आणि ब्लड शुगरचे जास्त प्रमाण या दोन्ही कारणांमुळे 'मेटाबॉलिज्म' प्रभावित होऊ शकते. मेटाबॉलिज्म या रासायनिक प्रक्रियेमध्ये गडबड झाल्यास 'मेटाबॉलिक डिसऑर्डर'ची समस्या निर्माण होते. यामुळे  'टाईप -2' मधुमेहाचा धोका वाढू लागतो. यामुळेच हे संशोधन सकाळी साडेआठच्या अगोदरच नाश्ता करण्याचा सल्ला देते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT