जेकब डायमंड Pudhari File Photo
विश्वसंचार

कुठे आहे ‘जेकब डायमंड?’

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : टॉवर ऑफ लंडन येथे असलेला कोहिनूर हिरा सर्वश्रुत आहे. देश-विदेशातील पर्यटक हा हिरा न्याहाळण्यासाठी रोज मोठ्या संख्येने आवर्जून येथे येतात. मात्र, कोहिनूरपेक्षा दुपटीने मोठा असलेला एक हिरा भारतातच आहे, याची क्वचितच सर्वांना कल्पना असेल.

पूर्वी हा हिरा हैदराबादच्या निजामाकडे होता. निजाम हा एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत होता; पण हा हिरा खास आहे, त्याचे कारण वेगळेच आहे. हा हिरा कोणाच्याच द़ृष्टीला पडू नये, यासाठी निजामाने हा हिरा चक्क आपल्या एका जुन्या बुटामध्ये लपवून ठेवला होता. हा हिरा ‘जेकब डायमंड’ म्हणून ओळखला जातो. निजामाला हा हिरा ज्याच्याकडे मिळाला, तो एक व्यापारी होता आणि त्याचे जेकब असे नाव होते. आश्चर्याची बाब म्हणजे या जेकबचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रहस्यमय होते. तो स्वतःला जोहरी, ज्योतिषी, जादूगार, विद्वान, लेखक आणि व्यापारी असे सर्व काही समजत असे. जेकब डायमंडशी तिघे जण अतिशय जवळचे होते. ते तिघे म्हणजे हैदराबादचे सहावे निजाम महबूब अली खान, त्यांचा अर्मेनियन सेवक अल्बर्ट आबिद आणि अलेक्झांडर मॅल्कम जेकब नावाचा एक रहस्यमयी जोहरी. 1890 च्या दशकात या जेकब डायमंडने भरपूर वाद निर्माण केला होता.

असे म्हणतात की, एकेकाळी भारत हा जगाचे ‘डायमंड कॅपिटल’ होता. चाणक्यच्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व चौथ्या शतकापासून देशातील हिर्‍यांचा उल्लेख आढळतो. बहुतांश हिरे हे आजच्या आंध्र प्रदेशात असलेल्या कृष्णा-गोदावरी पट्ट्यात सापडल्याचे उल्लेखही आहेत. डी. एफ. कराका या इतिहासकाराने असे नमूद केले आहे की, निजाम कपडे बदलतानाही अल्बर्ट आबिद हा त्यांचा अत्यंत विश्वासू सेवक तिथे उपस्थित असे. निजामाचे कपडे, बूट, घड्याळे, आभूषणे हे सर्व तो सांभाळत असे. निजाम कधीही एकदा वापरलेले सुट्स परत वापरत नसल्यामुळे, त्याच्या या विश्वासू सेवकाची चांगलीच चैन होत असे. तो असे सुट्स एक तर स्वत:साठी ठेवत असे किंवा काही दिवसांनी चक्क निजामालाच परत विकत असे. अशा प्रकारे निजामाला फसवून त्याने प्रचंड पैसे मिळवले आणि हैदराबादमध्ये एक भव्यदिव्य दुकान टाकले. आता ते दुकान नाही; पण आबिद स्क्वेअर अशी जागा मात्र आजही आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT