लंडन : हिर्यांच्या दुनियेत, हा हिरा खरोखरच सर्वात खास आणि वेगळा आहे. बोत्सवाना येथील कारोवे खाणीत एक असामान्य असा अर्ध-गुलाबी रत्न उत्खनन करताना सापडले आहे. या हिर्याचे वजन तब्बल 37.41 कॅरेट (7.5 ग्रॅम) इतके आहे. हा हिरा एक इंच लांब असून, गुलाबी आणि रंगहीन भागांमध्ये एक ‘तीक्ष्ण’ सीमा आहे.
या रंगाचे हिरे अत्यंत दुर्मीळ असतात, कारण त्यांच्या निर्मितीसाठी तापमान आणि दाबाची परिस्थिती अगदी योग्य असावी लागते. तज्ज्ञांचा विश्वास आहे की, हा हिरा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या गुलाबी हिर्यांपैकी एक असू शकतो. एचबी अॅन्टवर्प या हिरा कटिंग कंपनीचे सह-संस्थापक ओडेड मन्सोरी म्हणाले, ‘या रत्नाला आजपर्यंत पॉलिश केलेल्या सर्वात महत्त्वाच्या गुलाबी हिर्यांपैकी एक बनण्याची क्षमता आहे. याचा अत्यंत तीव— आणि समृद्ध रंग कारोवे खाणीच्या भूगर्भीय अद्वितीयतेचा पुरावा आहे.’
हा हिरा 3 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या आत अति उष्णता आणि दाब यांच्याखाली, पृष्ठभागापासून सुमारे 93-124 मैल (150-200 कि.मी.) खाली तयार झाला असावा. कार्बनचे अणू एका घट्ट जाळीमध्ये बांधले जातात, आणि नंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून ते पृष्ठभागावर आणले जातात. हिरा तयार होत असताना त्याच्या जाळीत अडकलेल्या अशुद्धतेमुळे त्याला रंग प्राप्त होऊ शकतो. परंतु, गुलाबी रंगाचे हिरे हे संरचनात्मक विकृतीचे उत्पादन असतात, याचा अर्थ भूगर्भीय प्रक्रियांमुळे त्यांची रचना बदललेली असते.
जास्त विकृतीमुळे हिरा तपकिरी होतो, म्हणजेच गुलाबी रंग येण्यासाठी योग्य संतुलन साधले जाणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, या हिर्यातील गुलाबी भाग प्रथम तयार झाला असावा, आणि त्यानंतर रंगहीन भाग विकसित झाला असावा. हा नवीन हिरा आतापर्यंत सापडलेला पहिला गुलाबी आणि रंगहीन नैसर्गिक हिरा नाही. मात्र, जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकाच्या (ॠखअ) तज्ज्ञांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी तपासलेले अशा प्रकारचे हिरे खूपच लहान होते, त्यांचे वजन दोन कॅरेट (0.4 ग्रॅम) पेक्षा जास्त नव्हते. यामुळे 37.41 कॅरेटचा हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरतो.