लुप्त वनस्पतीचा केला विकास Pudhari Photo
विश्वसंचार

एक हजार वर्षांपूर्वीच्या बीजातून लुप्त वनस्पतीचा केला विकास

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः इस्रायल व वेस्ट बँकमधील ज्युडियन डेझर्ट या वाळवंटातील एका गुहेत सध्या लुप्त झालेल्या वनस्पतीची एक हजार वर्षांपूर्वीची बीजे सापडली होती. आता संशकोधकांनी या बीजांचा वापर करून या लुप्त वनस्पतीला नवसंजीवनी दिली आहे. हजार वर्षांपूर्वीच्या या बीजातून आता एक झाड तयार झाले असून, या औषधी गुणधर्म असलेल्या झाडाचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्येही आहे.

या प्राचीन बीजापासून झाड विकसित करण्यासाठी संशोधकांनी चौदा वर्षे प्रयत्न केले होते. 1980 च्या दशकाच्या अखेरीस या झाडाच्या बिया पुरातत्त्व संशोधकांना ज्यिुडियन डेझर्टच्या एका गुहेत सापडल्या होत्या. त्यापासून विकसित केलेले ‘शेबा’ नावाचे हे झाड आता दहा फूट उंचीचे झाले आहे. याचा अर्थ हे प्राचीन झाड आता पुन्हा अस्तित्वात येऊन त्याची पूर्ण वाढ झाली आहे. संशोधकांना आता या वनस्पतीचे डीएनए, रासायनिक आणि रेडिओकार्बन विश्लेषण करणे शक्य होणार आहे. त्यामधून या झाडाचा मूळ स्रोतही तपासण्यात येईल.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या बियांपासून हे शेबा नावाचे झाड उगवले त्या इसवी सन 993 ते 1202 या काळातील होत्या. दक्षिण लेवंट म्हणजे सध्याच्या इस्रायल, पॅलेस्टाईन आणि जॉर्डनच्या परिसरात एकेकाळी अशी झाडे अस्तित्वात होती व कालांतराने लुप्त झाली. त्यापैकीच एका झाडाच्या बिया या गुहेत सुरक्षित राहिल्या होत्या. ही वनस्पती ‘कॉमीफोरा’ कुळातील आहे. या कुळातील झाडे ही प्रामुख्याने आफ्रिका, मादागास्कर आणि अरेबियन पेनिन्सुलामध्ये आढळतात. ‘शेबा’ या झाडाचे मूळ नेमके कुठले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT