डोळ्यांची क्षमता कॅमेराच्या मेगापिक्सेलपेक्षा जास्त प्रभावी. Pudhari File Photo
विश्वसंचार

आपले डोळे किती मेगापिक्सेलचे?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : बाजारात दर महिन्याला नवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. या स्मार्टफोनच्या कॅमेराचा दर्जा चांगला असतो. नवीन मोबाईल खरेदी करताना आपण कॅमेराचे मेगापिक्सेल प्रथम विचारात घेतो. कारण जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा चांगली फोटो क्वालिटी देतो. आपल्या डोळ्यांची क्षमता हे अशा कॅमेराच्या मेगापिक्सेलपेक्षा जास्त प्रभावी असते.

आपले डोळे म्हणजे डिजिटल कॅमेरा

आपल्या डोळ्यात नैसर्गिक लेन्स असते. ही लेन्स कॅमेर्‍याप्रमाणे काम करते. ही लेन्स काचेची नाही तर नैसर्गिक असते. आपले डोळे म्हणजे डिजिटल कॅमेरा आहे असं मानलं, तर ते 576 मेगापिक्सेलपर्यंतचे द़ृश्य अगदी सहजपणे पाहू शकतात. याचा अर्थ आपल्या डोळ्यांच्या लेन्स 576 मेगापिक्सेल क्षमतेच्या असतात. वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो का, असा प्रश्न तुमच्या मनात येईल. यावर हो असे उत्तर आहे. जसे वय वाढते तसे शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचा रेटिना कमकुवत होऊ लागतो. याचा थेट परिणाम दिसण्याच्या क्षमतेवर होतो. तसेच यामुळे डोळ्यांच्या मेगापिक्सेल क्षमतेतदेखील बदल होतात.

कॅमेर्‍याप्रमाणे माणसाचे डोळे काम करतात

माणसाचे डोळे कॅमेर्‍याप्रमाणे काम करतात. यात प्रमुख तीन भाग असतात. लेन्स हा त्यापैकी पहिला भाग होय. लेन्स प्रकाश एकत्र करून फोटो तयार करतो. सेन्सर हा दुसरा भाग फोटोच्या प्रकाशाचे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करतो. प्रोसेसर हा तिसरा महत्त्वाचा भाग असतो. यात इलेक्ट्रिक सिग्नलचे रूपांतर फोटोत करून पडद्यावर दाखवले जाते. डोळे एका वेळी 576 मेगापिक्सेलपर्यंत द़ृश्य पाहू शकतात. आपला मेंदू सर्व माहितीवर एका वेळी प्रक्रिया करू शकत नाही. तो केवळ काही भागांवर हाय डेफिनेशनमध्ये प्रक्रिया करतो. त्यामुळे कोणतेही द़ृश्य योग्य पद्धतीने पाहण्यासाठी आपल्याला डोळे त्या दिशेकडे फिरवावे लागतात किंवा त्यांची हालचाल द़ृश्यानुसार करावी लागते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT