Uncategorized

नंदुरबार : शहादा तालुका भूकंपाने हादरला

Pudhari News

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

मध्यप्रदेशात  केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे धक्के जिल्ह्यातील शहादा तालुक्यातही बसले. धक्कादायक माहिती अशी की नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवर धरणापासून 99 किमी अंतरावर या भूकंपप्रवण क्षेत्राची नोंद झाली आहे.

अधिक वाचा : मित्राच्या घरी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायला गेलेल्या तरुणीचा खून

मध्यप्रदेशात  केंद्रबिंदू असलेल्या  भूकंपाचे धक्के जिल्ह्यातील शहादा तालुक्यातही बसले. यामुळे काही काळ घबराट पसरली होती. दोन मनिटाच्या अंतराने दोनदा हे धक्‍के जाणवले.

भूकंपाचे धक्के बसून काही क्षण घरे, भिंती हादरल्या. भिंतींना बारीक तडे पडणे, वस्तू हलणे, पडणे असेही प्रकार लोकांनी अनुभवले. आज (शनिवार) शहादा शहरात दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी अचानक हा प्रकार घडला. दुसरा धक्का 1 वाजून 26 मिनिटांनी बसला. पहिला धक्का  3.2 रिश्टर स्केलचा असल्याची तर दुसरा धक्का 2.6 रिश्टर स्केलचा असल्याची नोंद झाली आहे. 

अधिक वाचा : सोम्या कोंबडीच्या… आवाज पुन्हा घुमणार!

शहादा येथील भूकंपाच्या धक्‍क्याचा अनुभव घेतलेल्या नागरिकांनी सांगितले की, संपूर्ण घर, जमीन हादरवून सोडणारा आवाज झाला. प्रचंड जड वजन घरावर आदळल्याचा भास झाला. काही जणांना जमीन हादरल्याचे जाणवले. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील राहणाऱ्या लोकांनी सुद्धा घरातील वस्तूंमधे काही क्षण का असेना परंतु बऱ्यापैकी कंपन निर्माण झाल्याचे पाहिले. तर काही नागरिकांनी खिडकीची तावदान वाजून पूर्ण ईमारत कंपनपावल्याचे अनुभवले. तिखोरा, जयनगर, वडाळी या ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा मोठी कंपने जाणवण्याची माहिती दिली. 

अधिक वाचा : संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला! सामना वाचत आहेत चांगली गोष्ट आहे, कालपर्यंत वाचत नव्हते

दरम्‍यान या प्रकारानंतर भिंतींना बारिक तडे गेल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 2001 यावर्षी भूकंपाचे मोठे हादरे बसले होते. कच्छ, भुज येथे झालेल्या मोठ्या भूकंपाचा तो परिणाम होता. त्यानंतर शहादा तालुक्यात काही वर्षांच्या अंतराने हलकी भूकंपने नोंदली गेली आहेत. दरम्यान, शहादा तालुक्यात काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून, तो भूकंप 3.2 रिश्टर स्केलचा आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर खरा भूकंप आला. मध्यप्रदेशात त्याचा केंद्रबिंदू आहे. आपल्याला फक्त धक्का जाणवला आहे, अशी माहिती सावळदा येथील भूकंम्प मापक केंद्रातील अधिकारी दिलीपसिंग ओंकारसिंग जाधव यांनी दिली आहे. तर  शहादा येथील तहसीलदार  मिलिंद कुलकर्णी यांना संपर्क केला असता,  तालुक्यात कुठेही  नुकसान झाल्याची माहिती नाही.  हलके धक्के जाणवले आहेत.  पाहणी सुरू करण्यात आली आहे  असे  कुलकर्णी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT