वैभव सुर्यवंशी BCCI
स्पोर्ट्स

Vaibhav Suryavanshi new record | वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये जलवा; युवा कसोटीत विक्रमी कामगिरी, मेहदी हसनचा विक्रम मोडला

Vaibhav Suryavanshi new record | ऐतिहासिक पराक्रम; सुरेश रैनालाही टाकले मागे

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Suryavanshi new record youth test cricket Mehadi hasan miraz, Suresh Raina

पुढारी ऑनलाईन न्यूज : भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला असून, एका युवा कसोटीत अर्धशतक झळकावत आणि बळी घेतलेला सर्वात लहान वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ही अतुलनीय कामगिरी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

पहिल्या युवा कसोटीतील झळाळती कामगिरी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या युवा कसोटीत सूर्यवंशीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली.

पहिल्या डावात, त्याचा बॅटने फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्याने फक्त 14 धावा करून माघारी परतावा लागला.

दुसऱ्या डावात मात्र त्याने आपली खरी ताकद दाखवत फक्त 44 चेंडूंमध्ये झटपट 56 धावा ठोकल्या.

या अर्धशतकासोबतच पहिल्या डावात लेफ्ट आर्म फिरकीने दोन बळी घेतले, ज्यामुळे तो एकाच युवा कसोटीत अर्धशतक आणि बळी घेणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला.

मेहदी हसनचा विक्रम मोडीत काढला

या आधी ही कामगिरी करणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू होता बांगलादेशचा मेहदी हसन मिराज, ज्याने 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मीरपूरमध्ये 15 वर्षे आणि 167 दिवस वय असताना ही कामगिरी केली होती. हे दोनवेळा करणाराही खेळाडू मेहदी हसन मिराज होता. तसेच भारताचा सुरेश रैना यानेही 15 वर्षे 242 दिवस वय असताना हे यश मिळवलं होतं.

सामन्याचा आढावा

भारताने प्रथम फलंदाजी करत 540 धावा केल्या. कर्णधार आयुष म्हात्रेचे शतक, आणि विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, राहुल कुमार आणि आरएस अम्ब्रिश यांच्या अर्धशतकांमुळे हा डाव मोठा झाला. इंग्लंडकडून अ‍ॅलेक्स ग्रीन आणि राल्फी अल्बर्ट यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 439 धावा केल्या. रॉकी फ्लिंटॉफ याने सर्वाधिक 93 धावा केल्या, तर भारतासाठी हेनिल पटेल याने 3 बळी घेतले.

दुसऱ्या डावात भारत 248 धावांवर ऑलआउट झाला. येथे विहान मल्होत्रा याने पुन्हा एकदा अर्धशतक ठोकत 63 धावा केल्या. इंग्लंडकडून आर्ची वॉन याने 6 बळी घेतले.

भविष्यातील स्टार

ही कामगिरी करत वैभव सूर्यवंशीने केवळ जागतिक विक्रम मोडला नाही, तर आंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या सर्वात लहान खेळाडूंच्या यादीतही तो सामील झाला आहे.

भारताच्या भविष्यातील क्रिकेटपटूंमध्ये आता त्याचे नाव निश्चितच पुढे पाहिलं जाईल. इंग्लंडमध्ये सध्या त्याचे प्रदर्शन चर्चेचा विषय ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT