जान्‍हवी कपूरचा उलझ आता ओटीटीवर पाहा  x account
मनोरंजन

Janhvi Kapoor Ulajh On OTT | जान्‍हवीचा 'उलझ' आता OTT वर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - ऑगस्टमध्ये रिलीज झालेले चित्रपट आता हळूहळू OTT वर दाकल होत आहेत. जान्हवी कपूरचा उलझ आता ओटीटीवर पाहायला मिळत आहे. OTT प्लॅटफॉर्मवर श्रद्धा कपूर -राजकुमार रावचा चित्रपट 'स्त्री २' प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. तर आता अजय देवगन-तब्बू आणि जान्हवी कपूरने देखील एन्ट्री मारली आहे.

'उलझ'ने OTT वर दाखल

२ ऑगस्टला जान्हवी कपूरचा चित्रपट 'उलझ' रिलीज झाला होता. रिपोर्टनुसार, ३५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ११.२५ कोटींचा बिझनेस करू शकला. आता उलझ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होत आहे.

'उलझ'चे दिग्दर्शन सुधांशु सरियाने केलं आहे तर विनीत जैन निर्माते आहेत. या चित्रपटा जान्हवी शिवाय रोशन मॅथ्यू, गुलशन देवैया आणि आदिल हुसैन हे चित्रपट मुख्य भूमिकेत आहेत.

नेटफ्लिक्सने दिली माहिती

नेटफ्लिक्स इंडियाने माहिती देत लिहिलं की, 'अशा जगात जिथे प्रत्येक शब्द खोटा आहे आणि प्रत्येत पाऊल जोखिमेने भरलेला आहे. सत्याच्या शोधात किती दूर जाईल. पाहा 'उलझ' आता नेटफ्लिक्सवर.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT