बंगळूर : रेणुकास्वामी हत्या प्रकरणात लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याने बळ्ळारीतील कारागृहात असणारा संशयित अभिनेता दर्शनची प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. यामुळे जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या दर्शनची पौच्छेहाट झाली आहे. प्राप्तीकर अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे पत्र न्यायालयाने बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहाला पाठवले आहे. दर्शनचा या हत्येमध्ये सहभाग होता. आपल्यावरील आरोप इतराने घ्यावा म्हणून त्याने लाखो रुपये खर्च केले. यासाठी मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम कुठून आली, ती रक्कम कशी वर्ग केली, याचा तपास प्राप्तीकर अधिकारी करणार आहेत. दर्शनने जामिनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी (दि. २७) त्यावर सुनावणी होणार आहे.