रमेश सिप्पींनी यांनी शोलेचे संपूर्ण दिग्दर्शन केलेले नाही, असा खुलासा सचिन पिळगावकर यांनी केला आहे. File Photo
मनोरंजन

किस्से 'शोले'चे | मी आणि अमजदने उचलला होता दिग्दर्शनाचा बराच भार - 'महागुरू' सचिन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय सिनेइतिहासातील मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे शोले. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९७५ला प्रदर्शित झाला, पण आजही या सिनेमाबद्दलचे कुतुहल कमी झालेले नाही. सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगाकर (Sachin Pilgaonkar) यांनी शोलेबद्दल काही नवे खुलास केलेले आहेत.

सचिन पिळगावर शोले या सिनेमाचे सहायक दिग्दर्शक होते, तसेच त्यांची या सिनेमात भूमिकाही आहे. त्यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाबद्दल काही नवी माहिती सांगितली आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की या सिनेमाचे संपूर्ण दिग्दर्शन रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांनी केलेले नव्हते.

"ज्या दृश्यात प्रमुख कलाकार आहेत, त्यांचे दिग्दर्शन सिप्पी स्वतः करायचे. तर इतर अॅक्शन सीनची जबाबदारी त्यांनी दुसऱ्या युनिटकडे दिलेली होती. मुख्य कलाकार नसलेले जे अॅक्शन सीन होते, त्याचे काम पाहाण्यासाठी त्यांनी दुसरे युनिट बनवले होते. अर्थात हे सर्व 'पासिंग शॉट' असायचे," असे ते म्हणाले. ही बातमी इकॉनॉमिक टाइम्सने दिलेली आहे.

हे सीनची जबाबदारी मोहम्मद अली, अॅक्शन डायरेक्टर अजिम आणि हॉलिवूडचे दोन व्यावसायिक जीम आणि जेरी यांच्याकडे होती. सिप्पी यांनी त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी आणि अमजद खान यांची निवड केली होती. आम्हा दोघांना दिग्दर्शन करण्यात रस आहे, हे सिप्पी यांनी ओळखले होते. त्यामुळे या दुसऱ्या युनिटच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आमच्याकडे दिली होती.

धरमजी, अमितजी आणि संजीव कुमार यांच्या भूमिका असलेले सीन दिग्दर्शित करण्याची जबाबदारी सिप्पी यांच्याकडे असायची आणि उरलेले सीन आम्ही हाताळत होतो, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT