कार अपघातानंतर अभिनेता प्रवीण डबासला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे  Instagram
मनोरंजन

कार अपघातानंतर अभिनेता प्रवीण डबास आयसीयूमध्ये, माय नेम इज खानमध्ये केलंय काम

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - एका कार अपघातात अभिनेता प्रवीण डबास गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी प्रवीणचा कार अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेनंतर त्याला मुंबईतील बांद्रा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार अपघातावेळी प्रवीण डबास स्वत: कार चालवत होता.

अभिनेता प्रवीण डबासचा प्रकृती नाजूक

सूत्रांनुसार, प्रवीण डबासची प्रकृती गंभीर आहे. त्याची पत्नी प्रीति झंगियानी देखील सध्या रुग्णालयात आहे. अद्याप रुग्णालयातून कोणतेही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही

प्रवीण डबासची पत्नी प्रीती झंगियानीने जारी केलं स्टेटमेंट

प्रवीण डबासची पत्नी प्रीती झंगियानीने स्टेटमेंट जारी करून सांगितलं आहे की, "मी आणि माझा परिवार या घटनेनंतर खूप शॉकमध्ये आहे. मेडिकल अपडेटनुसार, सीरियस कंसशन (डोक्यावर मार लागल्यानंतरची स्थिती) आहे. डॉक्टर सीटी स्कॅन आणि अन्य प्रकारच्या टेस्ट करत आहेत. सध्या त्यांची हालचाल नाही. ते रात्री लीगच्या वर्कलोडमध्ये खूप बिझी होते. सकाळी-सकाळी कार चालवताना त्यांचा अपघात झाला.

प्रवीणने खोसला का घोंसला, दिल्लगी, द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, मान्सून वेडिंग, मैंने गांधी को नहीं मारा, ये है जिंदगी, कुछ मीठा हो जाए, इंदु सरकार, रागिनी एमएमस २ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. तर प्रीती झंगियानीने 'मोहब्बते' चित्रपटात काम केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT