हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स सध्या आपल्या नवीन चित्रपट ‘डाय माय लव्ह’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 17 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या ‘द ग्रॅहम नॉर्टन शो’मध्ये लॉरेन्सने एक मजेशीर आणि थोडीशी धक्कादायक आठवण सांगितली. तिने सांगितले की, रिहर्सल दरम्यान दिग्दर्शिका लिन रामसे यांनी तिला आणि अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन यांना डान्स करण्यास सांगितले.
पहिल्याच दिवशी, लिनने आम्हाला विचारलं, ‘तुम्ही जे केलं ते लक्षात आहे का? मग ते नग्न होऊन करून दाखवा.’ या वक्तव्यानंतर शोमध्ये उपस्थित ब्रूस स्प्रिंगस्टीन आणि टेसा थॉम्पसन आश्चर्यचकित झाल्या. त्यावर लॉरेन्स हसत म्हणाली, ‘मला ‘नाही’ म्हणायला हवं होतं का? तुम्ही सगळे आश्चर्यचकीत दिसताय!’
हा चित्रपट अॅरियाना हार्विक्झ यांच्या 2017 मधील कादंबरीवर आधारित आहे. जेनिफरने खुलासा केला की, मार्टिन स्कॉर्सेसी यांनी तिला ही भूमिका करायला सांगितलं. ‘पुस्तक वाचलं तेव्हा वाटलं की यावर चित्रपट बनणे शक्य नाही, पण मी स्कॉर्सेसीला विरोध कशी करणार?’ दरम्यान, या चित्रपटाला 78व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 9 मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळाला आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 7 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.