अमिताभ बच्चन Instagram
मनोरंजन

Amitabh Bachchan | मराठी शब्द चुकीचा उच्चारल्याने अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

पुढारी वृत्तसेवा

महानायक अमिताभ बच्चन अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी ७०-८० चे दशक गाजवले. अजूनही अमिताभ यांची क्रेझ कायम आहे. अमिताभ सोशल मीडियावरही सातत्याने सक्रिय असतात. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते चाहत्यांची जाहीर माफी मागत असल्याचे दिसत आहे. चुकीचे मराठी बोलल्याने त्यांनी माफी मागितली आहे. व्हायरल व्हिडिओत मी कचरा करणार नाही, असे म्हणत त्यांनी चाहत्यांनाही कचरा न करण्याचे आवाहन केले होते; पण हा व्हिडिओ तयार करताना मराठी बोलण्यात अमिताभकडून मोठी चूक मराठी शब्द चुकीचा उच्चारल्याने अमिताभ यांची माफी झाली होती. याबाबत मित्र गायक सुदेश भोसले यांनी सांगितल्यानंतर त्यांना चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत चुकीचे मराठी बोलल्याबद्दल माफी मागितली आहे. तसेच या व्हिडीओत त्यांनी त्यांची चूकही सुधारली आहे.

अमिताभ म्हणतात की, नमस्कार, मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडीओ तयार केला होता. मी कचरा करणार नाही, असे मी मराठीत म्हणालो होतो; पण मराठी बोलताना मी कचरा या शब्दाचा चुकीचा उच्चार केला होता. माझे मित्र सुदेश भोसले यांनी माझी ही चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे मी पुन्हा हा व्हिडिओ करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT