भोसरीत महेश लांडगे समर्थकांचा महाविजयाचा संकल्प Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra Assembly Poll: भोसरीत महेश लांडगे समर्थकांचा महाविजयाचा संकल्प

प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल; सुमारे 40 हजार नागरिकांचा पदयात्रेत सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Political News: भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीअर्ज दाखल केला. या वेळी समर्थकांनी विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार केला.

सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेण्यात आले. त्यानंतर पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. बापुजी बुवा चौक- लांडगे लिंबाजी तालीम मित्र मंडळ- भैरवनाथ मंदिर- मारुती मंदिर- पीएमटी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम मंगल कार्यालय येथे पदयात्रेचा समारोप झाला.

भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय- मित्रपक्ष महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीअर्ज दाखल केला. या वेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना नेते इरफान सय्यद, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत उपस्थित होते. पूर्णानगर येथील निवडणूक कचेरीमध्ये उमेदवारीअर्ज दाखल करण्यात आला.

ढोल-ताशांचा गजर अन् जय श्रीरामचा नारा

ढोल-ताशा पथकांचा दणदणाट करीत 40 हजार समर्थकांचा जनसमुदायाची पदयात्रा दिमाखात निघाली. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच, प्रमुख चौकांत भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांवर पीएमटी चौकात आमदार महेश लांडगे यांनी ठेका धरला. समर्थक-हितचिंतकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विशेष म्हणजे, महायुतीच्या घटकपक्षांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. अत्यंत नियोजनबद्ध काढलेल्या पदयात्रेची संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे सांगता करण्यात आली.

10 वर्षे विकासाची.. निरंतर विश्वासाची..‘या ध्येयाने ही निवडून विकासाच्या मुद्यांवर आम्ही लढवत आहोत. पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी अविरतपणे काम करीत राहीन, असा शब्द देतो. ग्रामदैवतांसमोर नतमस्तक होऊन आणि वडीलधार्‍यांचे आशीर्वाद घेऊन उमेदवारीअर्ज भरण्यासाठी सकाळी निवासस्थानापासून पदयात्रेला सुरुवात झाली. भोसरी पंचक्रोशीतील सर्व सहकारी, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी तसेच, महायुतीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद आणि साथ यामुळे विजयी शंखनाद झाला आहे.
- महेश लांडगे, आमदार भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT