राष्ट्रीय

धावत्या कारमध्ये आग, गेटही लॉक; पुण्यातील अभियंता जिवंत जळाला!

Arun Patil

बैतुल (मध्य प्रदेश) ; वृत्तसंस्था : बैतुल येथे महामार्गावर धावत असलेल्या कारमध्ये अचानक आग लागली. कारमधील व्यक्ती जिवंत जळाली. नंतर पेटती कार एका झाडावर आदळली. मृत व्यक्तीची ओळख पटली असून सुनील सिद्दप्पा (39, पुणे) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा परासिया राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली.

सुनील हे एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी बैतुलच्या मोती वॉर्ड येथील सासरी आले होते. रानीपूर हनुमान डोल भागात फिरायला म्हणून ते कारने निघाले होते. धावती कार पेटत होती. नंतर नियंत्रण गेल्याने ती झाडावर आदळली.

वाटसरूंनी गावकर्‍यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. कारचे दरवाजेही जाम झाले. त्यामुळे सुनील बाहेर पडू शकले नाहीत आणि कारसह जिवंत जळाले. लोक पाहात राहिले. राणीपूर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले, पण ते दाखल झाले तोवर कार खाक झालेली होती. चेचिसवरून कारचा नंबर पोलिसांनी शोधून काढला आणि अखेर सुनील यांची ओळख पटली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT