तिरूपती लाडूवरून वाद, उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केले प्रायश्चित व्रत File Photo
राष्ट्रीय

"क्षमा करा प्रभू..." : तिरूपती लाडू वादावरून उपमुख्यमंत्र्यांच्‍या 'प्रायश्चित' व्रताला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन

Tirupati Laddu Controversy आंध्र प्रदेशमध्ये तिरूपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी मिश्रित तुपाचा वापर करण्यात आल्‍याचा अहवाल प्रात्‍प झाला होता. यामुळे देशात खळबळ उडाली होती. यामुळे दक्षिणेत राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात राज्‍याचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेता पवन कल्‍याण यांनी प्रायश्चित घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते आजपासून ११ दिवसांचा प्रायश्चित उपवासाला सुरूवात करणार आहेत. ११ दिवसांच्या प्रायश्चित दिक्षा म्‍हणजेच उपवासाला जाण्याआधी पवन कल्‍याण यांनी एक संदेश लिहिला आहे.

पवन कल्‍याण यांनी लिलिले आहे की, बालाजी भगवान! क्षमा करा प्रभू. तिरूपती प्रसाद लाडू ज्‍याला अत्‍यंत पवित्र मानण्यात येते. जुन्या शासकांच्या अनियंत्रित प्रवत्‍तीच्या परिणामस्‍वरूप उपवित्र झाला होता. प्राणी चरबीच्या अवशेषांनी दूषित झाले होते. असे प्रकार क्रूर मनोवृत्‍तीचे लोकच करू शकतात. हे पाप सुरुवातीला ओळखू न शकणे म्हणजे हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे. लाडूच्या प्रसादात प्राण्यांचे अवशेष असल्याचे समजताच माझे मन अस्वस्थ झाले. मला स्वतःबद्दल अपराधी वाटते. मी जनतेच्या हितासाठी लढत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे अशी समस्या सुरुवातीला माझ्या लक्षात आली नाही.

सनातन धर्म मानणाऱ्यांना आवाहन

त्यांनी पुढे लिहिले आहे की, “सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कलियुगातील भगवान बालाजींच्या प्रसादाच्या लाडू सोबत झालेल्‍या या भयंकर दुष्कृत्याचे प्रायश्चित केले पाहिजे. याच भावनेने मी प्रायश्चित्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (२२ सप्टेंबर २०२४) सकाळी मी श्री दशावतार व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, नंबूर, गुंटूर येथे दीक्षा घेईन. 11 दिवस दीक्षा घेतल्यानंतर मी तिरुमला श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेईन. 'देवा... मागच्या सरकारांनी तुझ्याविरुद्ध केलेली पापे धुण्याची मला शक्ती द्या.'

'जे देवावर विश्वास ठेवत नाहीत ते असे गुन्हे करतात'

पवन कल्याण यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे की, “केवळ तेच लोक असे गुन्हे करतात, ज्यांचा देवावर विश्वास नाही आणि त्यांना पाप करण्याची भीती नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रणालीचा भाग असलेल्या मंडळाचे सदस्य आणि कर्मचारी देखील तेथील चुका शोधू शकत नाहीत याचे माझे दुःख आहे. त्यांना कळले तरी ते बोलत नाहीत. असे दिसते की ते त्या काळातील राक्षसी प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांना घाबरत होते.”

'पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या वागण्याने हिंदू दुखावले'

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, खरे वैकुंठ धाम समजल्या जाणाऱ्या तिरुमलाचे पावित्र्य, अध्यापनशास्त्र आणि धार्मिक कर्तव्यांचा निषेध करणाऱ्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धर्माचे पालन करणारे सर्व लोक दुखावले आहेत. त्याच बरोबर लाडू प्रसाद बनवताना प्राण्यांचे अवशेष असलेले तूप वापरले जात होते हे पाहून मन देखील अस्वस्थ झाले आहे. धर्माच्या पुनर्स्थापनेकडे पावले टाकण्याची वेळ आली आहे. "धर्मो रक्षिती रक्षितः"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT