पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर परिसरात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी आज (दि.८) हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
दहशतवाद्यांनी टेकडीवरून गोळीबार केला, वाहनावर ग्रेनेड फेकले
लष्कराचे दोन जवान जखमी
हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू
त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. त्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडही फेकले, अशी माहिती सूत्रांनी दिली.