जम्मू-कश्मीरचे बारामुल्लाचे खासदार इंजिनिअर राशिद  File Photo
राष्ट्रीय

फुटीरतावादी नेता, खा. इंजिनिअर राशिद तिहार तुरुंगातून बाहेर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-कश्मीरचे बारामुल्लाचे खासदार इंजिनिअर राशिद यांची आज (दि.11) तिहार तुरुंगातून जामीनावर सुटका झाली. दिल्ली न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात 2 ऑक्टोबरपर्यंत त्‍यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचे खासदार शेख राशीद उर्फ राशीद इंजिनियर यांना अंतरिम जामीन दिला आहे. न्यायालयाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दहशतवादी फंडिंग प्रकरणात २ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता.

लाेकसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्लांचा केला हाेता पराभव

२०२४ लोकसभा निवडणुकीमध्‍ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून रशीदने निवडणूक जिंकत सर्वांना धक्‍का दिला होता. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्‍यांनी केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर रशीद 2019 पासून तिहार तुरुंगात हाेते.

नया काश्‍मीर मोहिमेविरोधात लढणार

अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माध्‍यमांशी बोलताना रशीद म्‍हणाले कीण "मी जम्‍मू-काश्‍मीरमधील लोकांना निराश करणार नाही. पंतप्रधान मोदींची 'नया काश्मीर' मोहिम पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी त्‍यांनी ३७० कलम हटवले होते. यानंतर त्‍यांना जनतेने नाकारले. मी माझ्या लोकांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. माझा लढा हा लोकांसाठी आहे. मी माझ्या लोकांना एकत्र करण्यासाठी काश्मीरमध्ये येत आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT