नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लॅन्सेट काऊंटडाऊन ऑन हेल्थ अँड क्लायमेट चेंज 2025 च्या जागतिक अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) होणार्या जागतिक मृत्यूंपैकी सुमारे 70 टक्के मृत्यू भारतात होतात. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने जागतिक आरोग्य संघटनेच्या भागीदारीत तयार केलेल्या या अहवालात अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत.
या अहवालानुसार, भारतात दरवर्षी होणार्या 17.2 लाख मृत्यूंपैकी 44 टक्के (7,52,000) मृत्यू जीवाश्म इंधनामुळे होतात. यातील सर्वाधिक मृत्यू कोळसा (3,94,000) आणि विशेषतः ऊर्जा प्रकल्पांमुळे (2,98,000) होतात. वाहतुकीसाठी वापरले जाणारे पेट्रोल 2,69,000 मृत्यूंसाठी कारणीभूत आहे. 2010 पासून मानवनिर्मित वायू प्रदूषणामुळे होणार्या मृत्यूंमध्ये 38 टक्के वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर वायू प्रदूषणामुळे होणार्या 25 लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू भारतात होतात, हे एक गंभीर वास्तव आहे.
1. भारतात मानवनिर्मित 2.5 प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 17.2 लाख मृत्यू होतात.
2. जीवाश्म इंधनामुळे होणार्या मृत्यूंमध्ये कोळसा आणि द्रव वायूचा मोठा वाटा आहे.
3. वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या पेट्रोलमुळे 2.69 लाख मृत्यू होतात.
4. 2022 मध्ये बाहेरील वायू प्रदूषणामुळे झालेल्या अकाली मृत्यूंचा आर्थिक फटका 339.4 अब्ज इतका आहे.