CM Fadnavis new podcast pudhari photo
राष्ट्रीय

CM Fadnavis new podcast : "महाराष्ट्राची कहाणी सुरू होते देवाच्या पावलांनी..." : CM फडणवीस

आषाढी एकादशीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या महाराष्‍ट्रधर्म 'पॉडकास्‍ट'ला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

CM Fadnavis new podcast : ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्ट आज (दि. ६जुलै) आषाढी एकादशीपासून सुरू झाला आहे. दर महिन्याला एका विषयावर हा पॉडकास्ट होणार आहे. पहिल्‍या पॉडकास्टचा विषय आहे ‘महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणीची ही गाथा… वारीची गाथा..’

आषाढीच्या मुहूर्तावर 'महाराष्ट्रधर्म' विशेष पॉडकास्ट मालिका सुरु

महाराष्ट्रधर्म या पॉडकास्‍टबाबत माहिती देताना 'एक्‍स'वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी म्‍हटलं आहे की, पायाभरणी आणि उभारणी -रामायणापासून ते महाभारतापर्यंत...जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणार्‍या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत...महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणीची ही गाथा... वारीची गाथा...आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेतील पहिले चरण...

रामायणात महाराष्‍ट्र भूमीचा उल्लेख

पहिल्‍या पॉडकास्टमध्‍ये  संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्‍याबरोबर संवाद साधताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, “महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल. त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते. महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी. रामायणात या भूमीचा उल्लेख आहे. महाराष्‍ट्राची भूमी पुराणामध्‍येही आहे. अतिशय पवित्र असे याचे स्‍मरण सातत्‍याने होते.

भगवान बुद्ध महाराष्‍ट्राच्‍या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोहचले

भगवान बुद्धही महाराष्‍ट्राच्‍या भूमितून विजयातून नाही तर शांततेतून पोहचले. ते स्‍वत: कधी येथे आले नाहीत मात्र त्‍यांचे शब्‍द आले. अंजिठाच्‍या शांत डोंगररांगांमध्‍ये भिश्रूंनी त्‍यांच्‍या कथा दगडात कोरल्‍या. एका राजकुमाराने शांततेसाठी सर्व काही सोडले. जगाला दु:खातून मुक्‍त होण्‍याचा मार्ग दाखवला. महाराष्‍ट्राने भगवान गौतम बुद्धांचे शब्‍द केवळ ऐकले नाहीत तर या शब्‍दांना गुफा, स्‍मृती आणि आत्‍मांमध्‍ये जपलं. महाराष्‍ट्रातील दैवी उर्जेमुळे येथे सत्‍याचा, विश्‍वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत आले आणि रमले, असेही फडणवीसांनी नमूद केले.

महाराष्‍ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा

महाराष्‍ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा आहे. संतांच्‍या माध्‍यमातून ही भूमी घडली. १३ व्‍या शतकात चक्रधर स्‍वामींनी महानुभाव पंथाची स्‍थापना केली. या पथाने जातपात नाकारली. त्‍यांची मराठीत लिहिलेली शिकवण झाली होती. महानुभाव पंथाने केवळ भक्‍ती शिकवली नाही तर न्‍यायपूर्ण अशी जीवनशैलीही लोकांना शिकवली, असेही फडणवीस म्‍हणाले.

वारी सामाजिक समतेचा झरा बनली

नम्रता आणि श्रद्धा यावर आधारित वारीची परंपरा आली. दरवर्षी भक्‍तीवर आधारित असणारी वारी ही सामाजिक समतेचा झरा बनलेली आहे. वारीमध्‍ये जातीला थारा नाही. सारे भेदाभेदे वसरले जातात. सर्व वारकरी एकत्र हा उत्‍सव साजरा करतात. संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे मराठीत भाष्‍य करत महाराष्‍ट्राला ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्‍कृतीमधील सर्वोत्तम प्रार्थना आहे. यानंतर महाराष्‍ट्रात झालेले संत केवळ उपदेशक नव्‍हते तर भक्‍तीचे लोकशाहीकरण करणारे शस्‍त्र हाती न घेणारे योद्धे होते, असेही या पाॅडकास्‍टमध्‍ये मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT