अंबानी कुटुंबियांकडून सामुहिक विवाह सोहळा File Photo
राष्ट्रीय

अंबानी कुटुंबियांकडून सामुहिक विवाह सोहळा संपन्न

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क :

अंबानी कुटूंबाने सामाजिक आणि परोपकार भावनेने अनंत अंबानी आणि राधीका मर्जंट या दोघांच्या लग्नानिमित्ताने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाहसमारंभात ५० पेक्षा अधिक जोडपी सहभागी झाले होते. या समारंभाने अनंत आणि राधिका यांच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. Anant Ambani-Radhika Merchant Wedding

अंबानी कुटूंब गेले काही दिवस अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यानिमित्ताने चर्चेत आहे

सामुदायिक सोहळ्याला ५० हून अधिक जोडपी सहभागी

अंबानी कुटूंब गेले काही दिवस अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यानिमित्ताने चर्चेत आहे. अंबानी कुटूंबाने सामाजिक भावनेने सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाहसोहळ्य़ाने अनंत आणि राधीका या दोघांच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. या समारंभात तब्बल ५० हून अधिक जोडपी सहभागी झाले होते. या सोहळ्याला मुकेश अंबानी, नीता अंबानी, मुलगा आकाश, श्लोका मेहता, ईशा अंबानी यांच्यासह ८०० हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती होती, यामध्ये सहभागी जोडप्यांचे कुटूंबीय, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. हा समारंभ रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे झाला.

या विवाहसमारंभात ५० पेक्षा अधिक जोडपी सहभागी झाले होते.

प्रत्येक जोडप्याला भेटवस्तू

या सोहळ्यादरम्यान अंबानी कुटुंबाने आनंद व्यक्त करत प्रत्येक जोडप्याला वैयक्तिकरित्या शुभेच्छा दिल्या. सदिच्छा देत सहभागी जोडप्याला नवीन प्रवासाची सुरुवात सुलभ करण्यासाठी, प्रत्येक जोडप्याला भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये नववधूंना सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, लग्नाच्या अंगठ्या आणि नथ, तसेच जोडवी आणि पैंजण यांसारखे चांदीचे दागिने त्याचबरोबर प्रत्येक वधूला ५० हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. तिचे 'स्त्रीधन' म्हणून १.०१ लाख देण्यात आले. Anant Ambani-Radhika Merchant Wedding

याव्यतिरिक्त, जोडप्यांना आवश्यक किराणा सामान आणि एक वर्षासाठी पुरेशा घरगुती वस्तू, उपकरणे पुरविल्या गेल्या. विवाह सोहळ्यानंतर, उपस्थितांना एक भव्य जेवण देण्यात आले.

सहभागी जोडप्याला भेटवस्तू देण्यात आल्या.

या सर्व जोडप्यांना माझे आशीर्वाद

या सोहळ्यात वारली जमातीने सादर केलेले पारंपारिक तारपा नृत्य दाखवण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा, नीता अंबानी म्हणाल्या, "येथे नवविवाहित जोडप्यांना पाहून मला खूप आनंद होतो. मी या सर्व जोडप्यांना माझे आशीर्वाद देते. अनंत आणि राधिका यांच्या 'शुभ लग्न' सोहळ्याची आजच्या सामूहिक विवाह सोहळ्याने सुरुवात झाली आहे. अंबानी कुटुंबाचा हा उपक्रम सामाजिक जबाबदारीची त्यांची कायम बांधिलकी आणि "मानवतेची सेवा हीच ईश्वरसेवा आहे दर्शवितो"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT