स्‍वत: जिवंत असल्‍याचा पुरावा मिळवण्‍यासाठी पाथुरी देहुरी यांनाआपल्‍या घरापासून पंचायत कार्यालयापर्यंत सुमारे दोन किलोमीटर चक्‍क रांगत जावे लागले.  (Image source- X)
राष्ट्रीय

'जिवंत' असल्‍याच्‍या पुराव्‍यासाठी आजीला २ किलोमीटर रांगावे लागले!

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...' ज्‍येष्‍ठ कवी सुरेश भट यांच्‍या कवितेमधील या ओळी जगणं किती छळणारे असू शकते, हे सांगतात. असेच जगण्‍यातलं छळणे ओडिशातील ७० वर्षीच्‍या आजीने अनुभवलं आहे. ओडिशा सरकारने वृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जावून पेन्शन पोहोचवण्याचे आदेश दिले असतानाही पंचायत अधिकार्‍याने ७० वर्षाच्‍या आजीला कार्यालयात येण्‍यास सांगितले. स्‍वत: जिवंत असल्‍याचा पुरावा मिळवण्‍यासाठी त्‍यांना आपल्‍या घरापासून पंचायत कार्यालयापर्यंत सुमारे दोन किलोमीटर चक्‍क रांगत जावे लागले. हा वेदनादायी प्रसंग एका व्‍हिडिओमुळे सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. विशेष म्‍हणजे हा संपूर्ण प्रकार ओडिशातील मुख्‍यमंत्री मोहन चरण माझी यांच्‍या केओंझारमध्‍ये घडला आहे.

पेन्शनसाठी कार्यालयात येण्‍याचा आदेश 

ओडिशातील क्योंझोरमधील रायसुआन गावातल्या पाथुरी देहुरी यांना सरकारी पेन्शन मिळते. म्हातारपण आणि आजारपणामुळे नीट चालताही येत नसताना पंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांना पेन्शनचे पैसे घ्यायला कार्यालयात येण्याचा निरोप धाडलेला.

व्हिडीओ व्हायरलमुळे संतापजनक प्रकार उघडकीस

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच पेन्शन देण्याचे सरकारी आदेश असतानाही पाथुरी आजींना गावापासून २ कि.मी. पर्यंत पंचायत कार्यालयासाठी रांगत यावे लागले. घटना २१ सप्टेंबरची आहे आणि मंगळवारी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. रायसुआनचे सरपंच बागुन चंपिया यांनी पुरवठा सहायकांना पुढील महिन्यापासून पाथुरीआजींना पेन्शन आणि रेशन घरपोच देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT